India vs Pakistan: "फायनल तर भारत-पाकिस्तानमध्येच होणार!"; क्रिकेट विश्वात खळबळ, 'या' माजी खेळाडूचा मोठा दावा

India vs Pakistan T20 World Cup 2026: येत्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना रंगणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना रंगणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. ग्रुप स्टेजचे सामने संपल्यानंतर आता सुपर-८ फेरीची धावपळ सुरू झाली असून, क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी आपापले तर्क मांडायला सुरुवात केली आहे. यातच पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अली याने केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.

बासित अलीची खळबळजनक भविष्यवाणी

एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये बासित अलीने आगामी सेमीफायनलमधील चार संभाव्य संघांबाबत विचारण्यात आले होते. त्यावर बासित अली यांनी केवळ सेमीफायनलच नाही, तर थेट फायनलची भविष्यवाणी करून सर्वांना चकित केले. ते म्हणाले, "मी सांगतोय, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाचा अंतिम सामना खेळतील." बासित अली यांच्या मते, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये धडक मारतील, पण जेतेपदासाठी खरी लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होईल.

India vs Pakistan
Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

कामरान अकमलची सावध प्रतिक्रिया

याच चर्चेत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल यानेही आपली पसंती दर्शवली. अकमलने सेमीफायनलसाठी भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या चार संघांची निवड केली आहे. बासित अली यांच्या विधानाने चाहत्यांमध्ये उत्साह असला, तरी सध्याची आकडेवारी पाकिस्तानसाठी फारशी अनुकूल दिसत नाही.

भारताचे वर्चस्व

पाकिस्तानी दिग्गज जरी फायनलची स्वप्ने पाहत असले, तरी मैदानावरची परिस्थिती वेगळी आहे. सुपर-८ च्या ग्रुपमध्ये पाकिस्तानसमोर इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसारखी तगडी आव्हाने आहेत. या संघांविरुद्ध विजय मिळवणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल. विशेष म्हणजे, ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला आधीच एकतर्फी सामन्यात धूळ चारली आहे.

India vs Pakistan
Goa Electricity Bill: गोव्यात वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! दंड आकारणीचा फटका; लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण

१५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला होता. भारताने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव केवळ ११४ धावांत गारद झाला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या फलंदाजीतील उणिवा उघड झाल्या असून, सुपर-८ मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना मोठा चमत्कार करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com