IND W vs PAK W: भारताची टी-20 वर्ल्डकप मोहीम आजपासून, सलामीला पाक प्रतिस्पर्धी; अनुभवात हरमनप्रीतचा संघ वरचढ

IND W vs PAK W T20 World Cup 2026: काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडक जिंकल्यानंतर आता भारतीय महिला संघाला टी-२० विश्वकरंडकातही अजिंक्यपद मिळवण्याचे वेध लागले आहेत.
IND W vs PAK W T20 World Cup 2026
IND W vs PAK W T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

बर्मिंगहॅम: काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडक जिंकल्यानंतर आता भारतीय महिला संघाला टी-२० विश्वकरंडकातही अजिंक्यपद मिळवण्याचे वेध लागले आहेत. या मोहिमेची सुरुवात उद्या होत असून सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे. भारतीयांचा एकूणच अनुभव पाहता ही लढत जिंकणे कठीण जाणार नाही.

महिलांची ही टी-२० विश्वकरंडक स्पर्धा शुक्रवारपासून सुरू झाली आणि सगळ्यांचे लक्ष आता बर्मिंगहॅमच्या एजबास्टन मैदानाकडे लागले आहे. कारण साधे आहे भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत लढणार आहे. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यावर संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

IND W vs PAK W T20 World Cup 2026
Goa Weather Update: ऐन जूनमध्ये घामाच्या धारा, मान्सूनचा वेग मंदावला; कमाल तापमान 34.2 अंशांवर

हरमनप्रीत कौरच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दोन संघांदरम्यान झालेल्या सामन्यात बहुतांशी वेळा भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यातही भारतीय संघ गुणवत्ता आणि बरोबरीने दर्जेदार २० क्रिकेट खेळण्याच्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्मृती मानधना आणि शेफाली वर्माची सलामीची जोडी आक्रमक खेळ करते, याचा विचार करून त्यांना रोखायला पाकिस्तान सादीया इक्बाल आणि नाशरा सिंधूचा वापर करेल, असे वाटते. भारतीय संघाची ताकद फलंदाजीत दडलेली आहे. कप्तान हरमन प्रीत कौर सोबतीला जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष आहेत. उलटपक्षी पाकिस्तानची मुख्य मदार कप्तान फातिमा सनावर आहे. भारताची गोलंदाजी चालू असताना लक्ष रेणुका सिंग ठाकूर आणि अष्टपैलू दीप्ती शर्मावर असेल.

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेअगोदर इंग्लंडमध्ये काही सामने खेळले असल्याने स्थानिक वातावरणाशी जुळवून घेताना खेळाडूंना कठीण जाणार नाहीये. रविवारच्या सामन्यासाठी एजबास्टन मैदानाची खेळपट्टी टी-२० क्रिकेटला साजेशी म्हणजे फलंदाजीला पोषक बनवायचा प्रयत्न केला जातो आहे. बर्मिंगहॅमला अजून खूप गरम हवा नाही. म्हणजेच आल्हाददायक वातावरणात सामना होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

IND W vs PAK W T20 World Cup 2026
Goa Corjuem island: मांडवीच्या उपनदीत निसर्गसंपन्न 'खोर्जुवे बेट'

तयारी उत्तम : अमोल मुजुमदार

सराव आणि सामन्याचे योग्य मिश्रण झाल्याने भारतीय संघाची तयारी मस्त झाली आहे. आम्ही सरावa सामन्यात निर्माण होऊ शकणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांचा आणि परिस्थितीचा अभ्यास केला आहे. खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि अपेक्षांचे ओझे झेलत सर्वोत्तम खेळ करायला उत्सुक आहेत. सर्वांना कल्पना आहे, की सामना पाकिस्तानसमोर असला की वातावरण बदलते. त्यामुळे खेळाडू त्याची मनातून तयारी करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com