Goa Weather Update: ऐन जूनमध्ये घामाच्या धारा, मान्सूनचा वेग मंदावला; कमाल तापमान 34.2 अंशांवर

Goa Weather: यंदा मान्सूनने गोव्यात वेळेवर हजेरी लावली तरी अपेक्षित वेग आणि तीव्रता अद्याप दिसून आलेली नाही.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यंदा मान्सूनने गोव्यात वेळेवर हजेरी लावली तरी अपेक्षित वेग आणि तीव्रता अद्याप दिसून आलेली नाही. उलट गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर मंदावल्याने ऐन जून महिन्यात नागरिकांना उकाडा आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे.

काल राज्यात कमाल ३४.२ तर किमान २८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जून महिन्यात आत्तापर्यंत ११.३५ इंच पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु केवळ ६.२० इंच पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाचा तब्बल ४५ टक्के तुटवडा आहे.

Goa Weather Update
Goa Corjuem island: मांडवीच्या उपनदीत निसर्गसंपन्न 'खोर्जुवे बेट'

जून ते सप्टेंबर या कालावधीत ‘एल-निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. १८ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. उद्या रविवारी राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. - नहुष कुलकर्णी, संचालक (गोवा वेधशाळा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com