Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Viresh Borkar Manoj Parab Latest News: परब कोणती भूमिका घेणार? पक्षाबाबत ते काय वक्तव्‍य करणार? हे पाहूनच पुढील वाटचाल करण्‍याचा निर्णय बोरकर यांनी घेतल्‍याची माहिती ‘आरजी’च्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.
Viresh Borkar Manoj Parab Latest News
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मनोज परब २ ऑक्‍टोबर रोजी पुन्‍हा रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) प्रवेश करणार असल्‍याच्‍या चर्चांना ऊत फुटताच, त्‍याच दिवशी मोठी घोषणा करणार असल्‍याचे जाहीर केलेल्‍या ‘आरजी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी कोणतीही घोषणा न करता तलवार म्‍यान केली.

परब कोणती भूमिका घेणार? पक्षाबाबत ते काय वक्तव्‍य करणार? हे पाहूनच पुढील वाटचाल करण्‍याचा निर्णय बोरकर यांनी घेतल्‍याची माहिती ‘आरजी’च्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

Viresh Borkar Manoj Parab Latest News
Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

काही महिन्यांपूर्वी ‘आरजी’तील अंतर्गत वादानंतर मनोज परब यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आमदार वीरेश बोरकर यांनी स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करून पक्षाची धुरा हाती घेतली.

दरम्यान, परब २ ऑक्टोबरला ‘आरजी’त पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे बोरकर समर्थक सावध झाले होते. बोरकर यांनीही मोठी घोषणा करण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे परब यांच्या निर्णयानंतर बोरकरांची पुढील भूमिका ठरणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com