Latest ODI Ranking: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. त्यातच बुधवारी (22 मार्च) आयसीसीने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. पण या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची घसरण झालेली दिसून आली आहे.
वनडे क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत सिराजला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. सिराजचे आता 702 रेटिंग पाँइंट्स झाले आहेत. त्याची सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला पहिल्या दोन सामन्यांत तीन विकेटच घेता आले. त्यामुळे त्याचे रेटिंग पाँइंट्स कमी झाले. ज्याचा फायदा जोश हेजलवून आणि ट्रेंट बोल्टला झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेजलवूड भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतीमुळे सहभागी झालेला नाही. त्याचेही रेटिंग पाँइंट्स कमी झाले आहेत. मात्र त्याचे रेटिंग पाँइंट्स कमी होऊनही सिराजपेक्षा अधिक असल्याने त्याने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याचे 713 रेटिंग पाँइंट्स आहेत. तसेच ट्रेंट बोल्ड 708 रेटिंग पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
याशिवाय भारताविरुद्ध वनडे मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या मिचेल स्टार्कला मोठा फायदा झाला आहे. तो देखील आणि 702 रेटिंग पाँइंट्ससह सिराजबरोबर संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच मोहम्मद शमीने या क्रमवारीत 5 स्थांनांची प्रगती केली असून तो 28 व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत सिराज व्यतिरिक्त पहिल्या 20 जणांमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.
फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. युवा फलंदाज शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच विराट कोहली सातव्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने एका स्थानाची प्रगती केली असून तो 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या वनडे क्रमवारीत मात्र पहिल्या 10 जणांमध्ये एकही भारतीय खेळाडू नसून या यादीत भारतीय खेळाडूची सर्वोच्च क्रमवारी सध्या 19 आहे. या क्रमांकावर सध्या हार्दिक पंड्या आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.