ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी वनडे रॅंकिंग जाहीर केली, ज्यामध्ये मोठा बदल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ 118 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तान संघाने टीम इंडियाला मागे टाकून आयसीसी वनडे रॅंकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. याआधी, पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. मात्र आता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
मात्र यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 4-1 ने जिंकली. ज्याचा त्याला या वनडे रॅंकिंगमध्ये फायदा झाला.
दुसरीकडे, भारतीय संघाने एका महिन्याहून अधिक काळ एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, त्यामुळे पाकिस्तान संघाला वनडे रॅंकिंगमध्ये फायदा मिळणे साहजिक आहे.
भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यात रेटिंग पॉइंटचे फारच कमी अंतर आहे. वार्षिक अद्ययावत क्रमवारीत, पाकिस्तानचे 116 रेटिंग गुण आहेत, तर भारताचे 115 रेटिंग गुण आहेत.
ऑस्ट्रेलिया - 118
पाकिस्तान - 116
भारत – 115
न्यूझीलंड - 104
ENG-101
वास्तविक, या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया या मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
याआधी काही एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. यंदाचा आशिया चषकही एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत यंदाच्या वनडे क्रमवारीत बरेच बदल पाहायला मिळू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.