India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना होणारच! पाकड्यांच्या 'यु-टर्न'मुळे 'ICC' ची मोठी बचत; 'इतक्या' कोटींचे नुकसान टळले

Pakistan's U-Turn For T20 World Cup 2026 Clash Against India: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

India Pakistan Cricket Controversy : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या भूमिकेत बदल करत, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताशी खेळण्यास हिरवा कंदील दिला आहे. या एका निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) तब्बल १७४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १५६० कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान टळले आहे.

बहिष्काराचे नाट्य आणि ICC चा मास्टरस्ट्रोक

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी भारताविरुद्धचा सामना न खेळण्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्या आठ दिवसांतच पाकिस्तानने माघार घेतली.

'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, जर हा सामना रद्द झाला असता, तर ब्रॉडकास्टर्स (प्रसारक), तिकीट विक्री आणि जाहिरात प्रायोजकांमार्फत मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली असती. ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) स्पष्ट शब्दांत ताकीद दिली होती की, केवळ एका सामन्यासाठी 'फोर्स मॅजर' (अनपेक्षित परिस्थिती) सारखे नियम लागू होणार नाहीत आणि बहिष्कार टाकल्यास पाकिस्तानला आर्थिक दंड किंवा बंदीला सामोरे जावे लागू शकते.

India vs Pakistan
Goa Crime: अबब! गोव्यात पकडले 5.91 कोटींचे ड्रग्ज; 5 विदेशींसह एकूण 27 जणांना अटक

पाकिस्तानने हा निर्णय बदलण्यामागे बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) विनंती महत्त्वाची ठरली. बांगलादेशने 'क्रिकेटच्या व्यापक हितासाठी' पाकिस्तानने हा सामना खेळावा असे आवाहन केले होते. या बदल्यात ICC ने बांगलादेशवर कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिले असून, २०२८ ते २०३१ दरम्यान एका ICC स्पर्धेचे यजमानपदही त्यांना देण्याचे मान्य केले आहे. तसेच, श्रीलंका आणि यूएई सारख्या मित्रराष्ट्रांच्या विनंतीनंतर पाकिस्तानने आपला हेका सोडला.

India vs Pakistan
Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

हा सामना रद्द झाला असता तर क्रिकेटच्या जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असता. आता पाकिस्तानच्या संमतीनंतर कोलंबोतील तिकीट दरांमध्ये आणि विमानांच्या तिकीट दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, हा निर्णय केवळ 'खेळाच्या भावनेसाठी' आणि जागतिक क्रिकेटमध्ये सातत्य राखण्यासाठी घेण्यात आला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, संभाव्य आर्थिक कोंडी आणि ICC ची कठोर भूमिका यामुळेच पाकिस्तानला नमते घ्यावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com