Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

12 Year Old Boy Sucide: पालकांचे रागावणे मुलांच्या हितासाठी असले तरी, कधीकधी त्याचे पर्यवसान अत्यंत भीषण घटनेत होऊ शकते, याची प्रचिती फोंडा तालुक्यातील शिरोडा येथे आली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: पालकांचे रागावणे मुलांच्या हितासाठी असले तरी, कधीकधी त्याचे पर्यवसान अत्यंत भीषण घटनेत होऊ शकते, याची प्रचिती फोंडा तालुक्यातील शिरोडा येथे आली आहे. शाळेला दांडी मारल्याबद्दल वडिलांनी दोन शब्द सुनावले, या रागातून एका १२ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगा हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून त्याचे कुटुंब शिरोडा परिसरात वास्तव्यास आहे. शुक्रवारी या मुलाने शाळेत जाण्यास नकार दिला किंवा शाळा चुकवली होती. या कारणावरून त्याचे वडील त्याला रागावले. वडिलांचे बोलणे मुलाच्या मनाला इतके लागले की, त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. जेव्हा घरात कोणी नव्हते, तेव्हा त्याने राहत्या घरी गळफास लावून घेतला.

Goa Crime
Goa: गोव्यातील 'त्या' जमिनीचा मालक पाकिस्तानी? केंद्रीय गृह मंत्रालयाने ठरवली Enemy Property; खंडपीठात आव्हान याचिका दाखल

शुक्रवारी सकाळी ११:५२ च्या सुमारास मुलाच्या वडिलांनीच फोंडा पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत वडिलांनी ओरडल्या व्यतिरिक्त आत्महत्येचे दुसरे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. केवळ एका क्षणाच्या रागातून या अल्पवयीन मुलाने आपले आयुष्य संपवले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Goa Crime
Goa Crime: कोयता-दांडक्याने मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी, जखमी अवस्थेत केली तक्रार; पुराव्याअभावी दाम्पत्य निर्दोष

परिसरात शोककळा

पोलीस पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. फोंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मुलांच्या मानसिकतेवर आणि पालकांच्या संवाद पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शिरोडा परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com