Goa Crime: अबब! गोव्यात पकडले 5.91 कोटींचे ड्रग्ज; 5 विदेशींसह एकूण 27 जणांना अटक

Goa Drugs Case: दोन दिवसांपूर्वी बार्देस तालुक्‍यातील पिळर्ण या गावात गोवा पोलिसांच्‍या क्राईम ब्रँचने टाकलेल्‍या छाप्यात १५.७९ लाखांचे कोकेन जप्‍त केले होते.
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एकाबाजूने गोवा पोलिस ‘झिराे टाॅलरन्‍स टू ड्रग्‍स’ असे म्‍हणत असले तरी दुसऱ्या बाजूने जी आकडेवारी पुढे येत आहे ते पाहिल्‍यास गोवा हे देशातील महत्त्वाचे ‘ड्रग्‍स डेस्टिनेशन’ बनल्‍याची बाब पुढे येत आहे. १ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या ४० दिवसांच्‍या कालावधीत गोव्‍यात तब्‍बल ५.९१ काेटी रुपयांचे ड्रग्‍स पकडले असून पकडलेले हे ड्रग्‍स फक्‍त हिमनगाचे टोक असल्‍याची भावना व्‍यक्‍त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी बार्देस तालुक्‍यातील पिळर्ण या गावात गोवा पोलिसांच्‍या क्राईम ब्रँचने टाकलेल्‍या छाप्यात १५.७९ लाखांचे कोकेन जप्‍त केले होते. या प्रकरणात ओमेरिगो फ्रायडे या नायजेरियन संशयिताला अटक केली होती. त्‍यापूर्वी ६ फेब्रुवारीला पिळर्ण येथेच दाेन ठिकाणी छापा टाकून एका उत्तरप्रदेशातील तर एका ओडिशाच्‍या व्यक्तीला अटक करीत त्‍यांच्‍याकडून दोन लाखांचा गांजा जप्‍त केला होता.

मागच्‍या आठवड्यात काणकोण पोलिसांनी चापोली आणि पाळोळे या दोन ठिकाणी छापे टाकून एका नायजेरियनासह तिघांना अटक केल्‍यानंतर गोव्‍यातील ड्रग्‍सचे व्‍यवसाय हा विषय पुन्‍हा चर्चेत आला असून आतापर्यंत ड्रग्‍स व्‍यवसाय उत्तर गोव्‍यापुरताच मर्यादित आहे, असे जे सांगितले जात होते त्‍यालाही छेद देणारी आकडेवारी या चालू वर्षाच्‍या ४० दिवसांत पुढे आली आहे. या कालावधीत एकूण २२ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्‍यातील

१२ प्रकरणे उत्तर गोव्‍यात तर दहा प्रकरणे दक्षिण गोव्‍यातील आहेत. यामुळे गोव्‍यात सगळीकडेच ड्रग्‍सचे जाळे पसरले आहे हे दिसून आले आहे. आतापर्यंत झालेल्‍या २२ प्रकरणांत एकूण २७ जणांना अटक केली असून त्‍यात १८ भारतीय, ५ विदेशी तर ४ गाेमंतकीय नागरिकांचा समावेश आहे. या विदेशी नागरिकांमध्‍ये तीन संशयित हे नायजेरियन असून चाैथी संशयित महिला असून ती अमेरिकन असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे. पाचवा संशयित हा न्‍यू गिनिया या देेशातील आहे.

यंदाची ठळक अशी प्रकरणे

चालू वर्षाच्‍या पहिल्‍या सव्‍वा महिन्‍यात गोव्‍यात २२ ड्रग्‍सची प्रकरणे उघडकीस आली असली तरी त्‍यातील दोन प्रकरणे मोठ्या प्रमाणावर ड्रग्‍सचा समावेश असलेली आहेत.

यातील पहिले प्रकरण ७ जानेवारी रोजी उघडकीस आले होते. बँकॉकहून गोव्‍यात आलेल्‍या एका प्रवाशाला माेपा विमानतळावर कस्‍टम अधिकाऱ्यांनी पकडल्‍यानंतर त्‍याच्‍याकडे ३.१६ काेटींचे ड्रग्‍स सापडले होते.

मागच्‍यावर्षीही थायलंडमार्गे गोव्‍यात आलेले सुमारे साडेचार काेटींचे ड्रग्‍स पोलिसांनी जप्‍त केले होते. गोव्‍यात सिंथेटिक ड्रग्‍स थायलंडमार्गे येतात, हे पुन्‍हा एकदा या घटनेने स्‍पष्‍ट केले.

४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पाळोळे येथे नायजेरियनाला अटक करून त्‍याच्‍याकडून १.१० कोटींचे ड्रग्‍स जप्‍त केले होते. ५ फेब्रुवारी रोजी म्‍हापसा येथे एकाला अटक करून ६५ लाखांचे ड्रग्‍स जप्‍त केले होते.

८ जानेवारीला हरमलात नायजेरियनाला अटक करून त्‍याच्‍याकडून २०.८० लाखांचे ड्रग्‍स पकडले होते. तर ८ फेब्रुवारी रोजी अटक केलेल्‍या नायजेरियनाकडून १५ लाखांचे ड्रग्‍स जप्‍त केले आहेत.

पार्टीसाठी वापरले जातात ड्रग्‍स

सध्‍या गोव्‍यात येऊन आपल्‍या बर्थ डे पार्टीज साजऱ्या करण्‍याचे नवीन प्रस्‍थ सुरू झाले असून त्‍यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्‍सचा वापर केला जातो. २६ जानेवारी रोजी वार्का येथे एका घरावर छापा घालून पोलिसांनी सुझान अपोलो (६७) या अमेरिकन महिलेसह दोन केरळीयन युवकांना अटक केली होती. त्‍यावेळी त्‍यांच्‍याकडे दोन लाखांचे ड्रग्‍स सापडले होते. पार्टीसाठी हे ड्रग्‍स पुरवले होते, अशी माहिती उपलब्‍ध झाली आहे.

‘पेडलर्स’ म्‍हणून कामगारांचा वापर

एकाबाजूने गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंथेटीक ड्रग्‍स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असताना दुसऱ्या बाजूने स्‍थानिक युवकांना गांजामार्फत या व्‍यसनाकडे आणले जात आहे. गोव्‍यात कामगार म्‍हणून काम करण्‍यासाठी आलेल्‍या बिगरगोमंतकीय कामगारांना यासाठी ‘पेडलर्स’ म्‍हणून वापरले जाते. ४ फेब्रुवारी रोजी कुडचडे येथे गोव्‍यात सुतार म्‍हणून काम करणाऱ्या तीन बिगरगोमंतकीयांना अटक केली असता त्‍यांच्‍याकडे ९.१० लाखांचा गांजा सापडला होता.

नायजेरियनासह एक ताब्यात

राज्यात अमलीपदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत गुन्हे शाखेने पिळर्ण-मार्रा परिसरात केलेल्या कारवाईत ३१.७९४ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १५.७९ लाख रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ओमेरिगो फ्रायडे याला ६ रोजी अटक केली होती तर सुधीर पालयेकर याला ८ रोजी अटक केली. दोघेही पोलिस कोठडीत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर, गुन्हे शाखेच्या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री १.१० ते ४.१० वा.दरम्यान पिळर्ण-मार्रा येथील गौतम हॉटेल रोडवरील एका मोकळ्या जागेत सापळा रचला होता. यावेळी ओमेरिगो फ्रायडे याला रंगेहाथ पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे ३१.७९४ ग्रॅम कोकेन सापडले. नंतर तपास करून ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गुन्हे शाखेने सुधीर पालयेकर याला अटक केली. याप्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम २१(ब), २५ आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Goa Drugs Case
Goa Crime: मोठी कारवाई! म्हापशात 65 लाखांचे ड्रग्स, कुडचडेत 9 लाखांचा गांजा जप्त; मजुरांचे बिहार कनेक्शन उघड

पार्टीसाठी वापरले जातात ड्रग्‍स

सध्‍या गोव्‍यात येऊन आपल्‍या बर्थ डे पार्टीज साजऱ्या करण्‍याचे नवीन प्रस्‍थ सुरू झाले असून त्‍यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्‍सचा वापर केला जातो. २६ जानेवारी रोजी वार्का येथे एका घरावर छापा घालून पोलिसांनी सुझान अपोलो (६७) या अमेरिकन महिलेसह दोन केरळीयन युवकांना अटक केली होती. त्‍यावेळी त्‍यांच्‍याकडे दोन लाखांचे ड्रग्‍स सापडले होते. पार्टीसाठी हे ड्रग्‍स पुरवले होते, अशी माहिती उपलब्‍ध झाली आहे.

Goa Drugs Case
Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

‘पेडलर्स’ म्‍हणून कामगारांचा वापर

एकाबाजूने गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंथेटीक ड्रग्‍स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असताना दुसऱ्या बाजूने स्‍थानिक युवकांना गांजामार्फत या व्‍यसनाकडे आणले जात आहे. गोव्‍यात कामगार म्‍हणून काम करण्‍यासाठी आलेल्‍या बिगरगोमंतकीय कामगारांना यासाठी ‘पेडलर्स’ म्‍हणून वापरले जाते. ४ फेब्रुवारी रोजी कुडचडे येथे गोव्‍यात सुतार म्‍हणून काम करणाऱ्या तीन बिगरगोमंतकीयांना अटक केली असता त्‍यांच्‍याकडे ९.१० लाखांचा गांजा सापडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com