Hardik Pandya: 'हार्दिक परतल्याने तो दुखावला असेल,' श्रीकांत यांनी उलगडला बुमराहच्या पोस्टचा अर्थ

Jasprit Bumrah: गेल्या आठवड्यात मुंबई इंडियन्सने हार्दिकला ट्रेडद्वारे पुन्हा संघात घेतल्यानंतर बुमराहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्याने लिहिले, 'कधीकधी मौन हे सर्वोत्तम उत्तर असते.'
Hardik Pandya| Jasprit Bumrah |Mumbai Indians
Hardik Pandya| Jasprit Bumrah |Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

'Hardik's return in Mumbai Indians must have hurt him,' Srikanth explains Bumrah's post:

माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांचे असे मत आहे की, अष्टपैलू हार्दिक पांड्याचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने जसप्रीत बुमराह दुखावला असण्याची शक्यता आहे. कारण पुढील काळात आपल्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळेल अशी बुमराहला आशा असेल.

गुजरात टायटन्ससोबत दोन हंगाम घालवल्यानंतर हार्दिकने मुंबई संघात पुनरागमन केले आहे. त्याने 2015 मध्ये मुंबईतून आयपीएल करिअरला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात मुंबई इंडियन्सने हार्दिकला ट्रेडद्वारे घेतल्यानंतर बुमराहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्याने लिहिले की, 'मौन कधी कधी सर्वोत्तम उत्तर असते.'

जसप्रीत बुमराहच्या पोस्टबद्दल श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'सध्याच्या घडीला कसोटी असो की मर्यादित षटकांचे क्रिकेट असो, बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. विश्वचषकातील त्याची कामगिरी विसरता येणार नाही. गेल्या वर्षीही इंग्लंडमध्ये पाचव्या कसोटी सामन्यात त्याने हंगामी कर्णधाराची भूमिका बजावली होती.

श्रीकांत पुढे म्हणाले, 'कदाचित बुमराहला वाईट वाटत असेल. हा त्याचा अहंकार देखील असू शकतो. परंतु संघ आता अशा एखाद्याला परत संघात आणत आहे ज्याने संघ सोडल्यानंतर त्याचा आनंद साजरा केला होता. त्यामुळेही बुमराह दुखावला असेल."

Hardik Pandya| Jasprit Bumrah |Mumbai Indians
Rinku Singh ODI Debut: रिंकू सिंह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर करणार वनडेत पदार्पण! चॅम्पियन कोचचं मोठं वक्तव्य

बुमराहने हार्दिकच्या ट्रे़डनंतर बुमराह मुंबई संघ व्यवस्थापनावर नाराज असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र असे का झाले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

रोहितने कर्णधारपद सोडल्यानंतर बुमराह किंवा सूर्यकुमार हे कर्णधारपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, आता हार्दिकचा त्या संघात समावेश झाल्याने तो कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. हार्दिक आगामी मोसमातही मुंबईचे कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो.

Hardik Pandya| Jasprit Bumrah |Mumbai Indians
Team India Coach: द्रविड गुरुजींचं मार्गदर्शन टीम इंडियाला यापुढेही मिळणार! BCCI ची मोठी घोषणा

जसप्रीत बुमराह 2015 मध्ये पदार्पण केल्यापासून मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. या वेगवान गोलंदाजाने संघासह चार विजेतेपद पटकावले आहेत. जसप्रीत बुमराहची खळबळजनक पोस्ट आणि मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकच्या पुनरागमनाची पोस्ट जवळपास एकाच वेळी आली होती.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबई व्यवस्थापन त्याला संघाचे नेतृत्व करण्यास तयार करेल, असे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com