Rinku Singh ODI Debut: रिंकू सिंह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर करणार वनडेत पदार्पण! चॅम्पियन कोचचं मोठं वक्तव्य

Rinku Singh ODI Debut, IND vs SA: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सुरेश रैना आणि एमएस धोनीची भूमिका बजावू शकणाऱ्या फिनिशरचा भारतीय संघ बऱ्याच दिवसांपासून शोध घेत आहे.
Rinku Singh
Rinku Singh @KRxtra
Published on
Updated on

Rinku Singh ODI Debut, IND vs SA: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सुरेश रैना आणि एमएस धोनीची भूमिका बजावू शकणाऱ्या फिनिशरचा भारतीय संघ बऱ्याच दिवसांपासून शोध घेत आहे. फिनिशर असा असावा की कधी कधी टॉप ऑर्डर कोसळल्यावर तो डाव सांभाळू शकेल. आयपीएल 2022 आणि आयपीएल 2023 मध्ये चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंहमध्ये अशी प्रतिभा दिसून आली आहे. यानंतर या खेळाडूला पदार्पणाची संधीही मिळाली. आता टी-20 इंटरनॅशनलमध्ये पदार्पण केल्यानंतर या खेळाडूनेही आपली छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, रिंकूच्या वनडे पदार्पणाची मागणी होत आहे.

दरम्यान, रिंकू सिंहने टीम इंडियासाठी आतापर्यंत आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि फक्त चार वेळा फलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीत या चार डावांत रिंकूने उत्तम फिनिशर होण्याचे स्कील दाखवून दिले आहे. त्याने चार डावात 128 च्या सरासरीने आणि 216 च्या स्ट्राईक रेटने 128 धावा केल्या आहेत. सध्याच्या ऑस्ट्रेलिया मालिकेतही तो चकीत करणारी कामगिरी करत आहे. पहिल्या दोन T20 मध्ये, दोन्ही वेळा महत्त्वपूर्ण धावा करत तो स्टार असल्याचे सिद्ध करुन दिले. हे लक्षात घेऊन आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि आयपीएल चॅम्पियन प्रशिक्षक आशिष नेहराने त्याच्या वनडे पदार्पणाबद्दल सांगितले आहे.

Rinku Singh
IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी! 'हे' दिग्गज खेळाडू खेळणार इंडिया ए संघाकडून?

रिंकू सिंह वनडेसाठी सज्ज!

आशिष नेहराने वनडे सामन्यात रिंकू सिंहला संधी देण्याची मागणी केली आहे. रिंकूबाबत नेहरा पुढे म्हणाला की, 'मला रिंकू सिंहमध्ये शीर्षस्थानी फलंदाजी करण्याची क्षमता दिसते. मला विश्वास आहे की, त्याला आता वनडे सामन्यात संधी द्यायला हवी आणि तसे होईल.''

दुसरीकडे, रिंकू सिंहने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 चेंडूत नाबाद 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टी20 मध्ये त्याने 9 चेंडूत नाबाद 31 धावा करत संघाची धावसंख्या 230 च्या पुढे नेली होती. सध्या या मागण्या मांडल्या जात आहेत पण त्याला वनडेत संधी मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Rinku Singh
IND vs SA: रोहितचं आक्रमण ते सूर्या-जड्डूचा कॅमियो, भारताने द. आफ्रिकेला नमोहरण करण्याची 5 कारणे

तसेच, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा संघ गुरुवारी जाहीर केला जाऊ शकतो, असेही वृत्त आहे. अशा परिस्थितीत रिंकू वनडेत खेळताना दिसणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण रिंकू सिंहने ज्या प्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय खेळायला सुरुवात केली आहे, त्यामुळे वनडे संघातही त्याच्या प्रवेशाचा अंदाज बांधणे चुकीचे नाही. अलीकडेच विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर संघात अनेक बदल होऊ शकतात. सूर्यकुमार यादव स्वत:ला सिद्ध करु शकला नाही आणि महत्त्वाच्या वेळी 30-40 धावा करु शकेल अशा फिनिशरच्या शोधात संघ आहे. सुरेश रैनाने 2011 च्या विश्वचषकात जे काम केले होते तेच काम सूर्याला 2023 मध्ये करता आले नाही. आता 2027 ची तयारी सुरु असताना, रिंकू सिंह त्या योजनेचा भाग बनू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com