Team India Coach: द्रविड गुरुजींचं मार्गदर्शन टीम इंडियाला यापुढेही मिळणार! BCCI ची मोठी घोषणा

Rahul Dravid Head Coach: द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदी कायम राहणार की नाही? अखेर BCCI ने केलं स्पष्ट
Rahul Dravid
Rahul DravidTwitter/ @BCCI
Published on
Updated on

BCCI announces extension of contracts for Rahul Dravid as Head Coach and Support Staff of Team India:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षण टीमबाबत बुधवारी (29 नोव्हेंबर) मोठी घोषणा केली आहे. वनडे वर्ल्डकप 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह प्रशिक्षण टीममधील सदस्यांचा कार्यकाळ संपला होता. पण आता सर्वांचाच कार्यकाळ वाढवण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारताच्या सपोर्ट स्टाफ यांच्या कराराचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. दरम्यान हा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे, याबद्दल बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.

बीसीसीआयने सांगितले की वर्ल्डकप 2023 स्पर्धा संपल्यानंतर त्यांनी द्रविडबरोबर त्याचा करार वाढवण्याबद्दल चर्चा केली होती. या चर्चेनंतर द्रविड आणि त्याच्या टीमने एकमताने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी तयारी दाखवली.

सध्या द्रविडव्यतिरिक्त भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षकपदी पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपटी टी दिलीप आहेत.

Rahul Dravid
Rahul Dravid: मैदानात टीम इंडियाची फटकेबाजी, पण लक्ष वेधलं ड्रेसिंग रुममधील द्रविडने! असं काय घडलं, पाहा

बीसीसीआयने पुढे म्हटले आहे की 'भारतीय संघाला एक रचना देण्यात द्रविडची भूमिका आणि त्याचा व्यावसायिकपणा महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर बीसीसीआय व्हीव्हीएस लक्ष्मणेचेही त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून सांभाळलेल्या भूमिकेबद्दल आणि प्रभारी प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल कौतुक करत आहे. मैदानात जशी द्रविड आणि लक्ष्मण यांची भागीदारी व्हायची, तशीच आता भारतीय क्रिकेट संघाला पुढे नेण्यासाठी होत आहे.'

दरम्यान, द्रविडच्या वाढवलेल्या कार्यकाळाबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनीही अभिनंदन केले.

त्याचबरोबर द्रविडनेही याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. द्रविड म्हणाला, 'भारतीय संघाबरोबरची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली. एकत्रितपणे आम्ही चढ-उतार पाहिले आणि या संपूर्ण प्रवासात संघातून मिळालेली साथ आणि पाठींबा महत्त्वाचा ठरला.

'आम्ही ड्रेसिंग रुममध्ये जे वातावरण निर्माण केले, त्याबद्दल अभिमान वाटत आहे. संघाच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीत ही संस्कृती कायम राहिल. संघात असणारी क्षमता आणि प्रतिभा शानदार आहे. आमचे नेहमीच योग्य मार्गावर आणि तयारीवर लक्ष केंद्रीत केले होते, त्याचा एकूणच निकालावर परिणाम दिसला.'

Rahul Dravid
Virat Kohli-Rahul Dravid Photo: 'कल्पना केली नव्हती...', द्रविडबरोबर फोटो शेअर करत विराटने लिहिली इमोशनल पोस्ट

याशिवाय द्रविडने बीसीसीआयचे आभारही मानले आहेत. त्याने म्हटले की 'मी बीसीसीआय आणि अधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या धोरणाला समर्थन दिले आणि या संपूर्ण कार्यकाळात मला पूर्ण पाठिंबा दिला.'

'ही भूमिका निभावण्यासाठी मला बराच काळ घरापासून दूर राहावे लागत होते. त्यामुळे माझ्या कुटुंबाने यात मला दिलेली साथ आणि त्यांच्या त्यागाबदद्ल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या या भूमिकेसाठी त्यांची साथ महत्त्वाची ठरली. आम्हाला वर्ल्डकपनंतर अनेक नवीन आव्हाने आहेत, पण यादरम्यान आम्ही उत्तम कामगिरी करण्यासाठी वचनबद्ध राहू.'

द्रविडने 2021 टी20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी सांभाळली होती. नुकतेच द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com