Rohit Sharma has informed the BCCI that he will not mind if he is not considered for T20 cricket from now on: एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यात लवकरच एक बैठक होणार आहे.
या बैठकीत संघाचा पुढील चार वर्षातील एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमधील रोडमॅप आणि रोहित शर्माच्या भविष्याविषयी चर्चा होणार आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
दरम्यान आणखी एक माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये रोहित शर्माने बीससीआयला कळवले आहे की, इथून पुढे टी20 क्रिकेटमध्ये त्याचा विचार नाही केला तरी त्याला काही हरकत नसेल.
रोहित शर्माने याआधीच निवड समितीला सांगितले आहे की, टी-20 क्रिकेटमध्ये इथून पुढे संघ निवडताना त्याच्या नावाचा विचार न केला तरी त्याचा कोणताही आक्षेप नसेल.
गेल्या काही वर्षांपासून निवड समिती तरुण खेळाडूंना सतत संधी देत आहे. त्यामुळे रोहित त्याच्या वनडे कारकिर्दीकडे कसा पाहतो हे पाहणे मनोरंजक असेल.
कारण 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहितचे वय जवळपास 40 असेल. पुढील मोठी एकदिवसीय स्पर्धा 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल जी पाकिस्तानमध्ये खेळली जाईल.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, विश्वचषकापूर्वी रोहितने निवड समितीला सांगितले होते की, इथून पुढे टी-20 साठी त्याच्या नावाचा विचार न केल्यास त्याला कोणताही आक्षेप नसेल. निवडकर्ते गेल्या एक वर्षापासून टी-20 मध्ये तरुण खेळाडूंना संधी देत आहेत. पुढील वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषक होणार असल्याने ते त्या रणनीतीपासून मागे हटण्यास तयार नाहीत.
“सध्या रोहित शर्मा त्याचे संपूर्ण लक्ष 2025 पर्यंत चालणार्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील सायकलवर केंद्रित करेल असे दिसते. कसोटी संघासाठी कर्णधार तयार करणे हा अजेंडाचा मुख्य भाग आहे. हार्दिक पांड्याला सतत दुखापती होत असल्याने निवडकर्ते एकदिवसीय संघासाठी पंड्याचा पर्याय शोधू शकतात,” असा दावा सूत्राने केला.
निवड समितीने स्पष्ट केले आहे की, त्यांना पुढे जाऊन खेळाडूंचा समूह तयार करायचा आहे. त्यामुळेच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेसाठी युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केले आहे.
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेसाठी निवडकर्ते अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवण्यास अनुउत्सुक असल्याचे कळते.
“निवड समितीचे विचार अगदी स्पष्ट आहेत की, त्यांना असे खेळाडू तयार करायचे आहेत जे संघासाठी दीर्घ कालावधीसाठी खेळतील. श्रेयस अय्यर कसोटीत पुनरागमन करत असून, शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्याने रहाणेला फारसा वाव नाही.
केएल राहुलचाही कसोटी सामन्यांसाठी विचार केला जाऊ शकतो कारण तो बॅकअप विकेटकीपिंग पर्याय असू शकतो,” असेही सूत्राने पुढे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.