हार्दिक पांड्याला संघात कायम न ठेवणं मुंबईसाठी फायद्याचं! अर्शदीप-बुमराहची जोडी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणार; आकाश चोप्राचं मोठं विधान VIDEO

Hardik Pandya Mumbai Indians latest news: आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडिंगबाबत क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे.
Hardik Pandya Mumbai Indians
Hardik Pandya Mumbai IndiansDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडिंगबाबत क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार असून, त्याच्या बदल्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईच्या संघात दाखल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या संभाव्य ट्रेडवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्याच्या मते, हार्दिक पांड्याच्या जाण्यापेक्षा अर्शदीप सिंगच्या येण्याचा मुंबई इंडियन्सला अधिक फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे, हार्दिकच्या अनुपस्थितीतही मुंबईकडे नेतृत्वासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे त्याने म्हटले आहे.

हार्दिकच्या जाण्याने मुंबईला फारसा फरक पडणार नाही?

आकाश चोप्राने आपल्या 'आकाशवाणी' या कार्यक्रमात मुंबई इंडियन्सच्या संभाव्य ट्रेडवर विश्लेषण केले. त्याच्या मते, कोणत्याही संघासाठी आपल्या कर्णधाराला सोडणे हा मोठा निर्णय असतो. मात्र, मुंबई इंडियन्सच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. कारण संघाकडे नेतृत्व करण्यासाठी आधीपासूनच अनुभवी खेळाडू उपलब्ध आहेत.

रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याचा पर्याय मुंबईकडे आहे. त्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचाही नेतृत्वासाठी विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडल्यास नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होणार नाही, असे आकाश चोप्राचे मत आहे.

हार्दिकच्या कामगिरीवरही उपस्थित केले प्रश्न

आकाश चोप्राने हार्दिकच्या मागील तीन आयपीएल हंगामांतील कामगिरीवरही भाष्य केले. 2024, 2025 आणि 2026 या तीन हंगामांपैकी केवळ एका हंगामात त्याची कामगिरी समाधानकारक राहिल्याचे त्याने सांगितले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत हार्दिककडून सातत्यपूर्ण योगदान मिळाले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

काही सामन्यांमध्ये त्याचा गोलंदाजीतील इकॉनॉमी रेटही 10 धावांच्या पुढे राहिला. तसेच फलंदाजी करताना वरच्या क्रमांकावर खेळण्याऐवजी त्याने खालच्या फळीत फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईच्या संघाला त्याच्याकडून अपेक्षित योगदान मिळाले नसल्याचे आकाशने नमूद केले.

Hardik Pandya Mumbai Indians
Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

नमन धीर ठरू शकतो हार्दिकचा पर्याय

हार्दिक पांड्याच्या जागी मुंबई इंडियन्स नमन धीरला अधिक संधी देऊ शकते, असेही आकाश चोप्राने म्हटले आहे. हार्दिक ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता नमन धीरमध्ये दिसत असल्याचे त्याचे मत आहे.

नमन धीरला अद्याप हार्दिकइतका अनुभव नसला, तरी त्याच्याकडे भविष्यात प्रभावी अष्टपैलू खेळाडू म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. त्याच्या कामगिरीत सुधारणा झाल्यास मुंबईला मधल्या फळीत एक चांगला पर्याय मिळू शकतो.

अर्शदीप-बुमराहची जोडी मुंबईसाठी ठरणार घातक?

संभाव्य ट्रेडमध्ये अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये आल्यास संघाची गोलंदाजी अधिक मजबूत होऊ शकते. मुंबईकडे आधीपासूनच जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत अर्शदीप आणि बुमराह ही जोडी प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठे आव्हान ठरू शकते.

नवीन चेंडूने विकेट मिळवण्याची क्षमता अर्शदीपकडे आहे. तसेच डेथ ओव्हर्समध्येही तो प्रभावी गोलंदाजी करू शकतो. दुसरीकडे, बुमराह आपल्या अचूक यॉर्कर आणि वेगातील बदलांसाठी ओळखला जातो. त्यामुळे हे दोघे एकाच संघात आल्यास मुंबईच्या गोलंदाजीला अतिरिक्त बळ मिळेल, असे आकाश चोप्राचे मत आहे.

Hardik Pandya Mumbai Indians
Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

पंजाब किंग्ससमोर अष्टपैलू खेळाडूंच्या निवडीचे आव्हान

या संभाव्य ट्रेडमुळे मुंबईपेक्षा पंजाब किंग्ससमोरील आव्हाने वाढू शकतात, असेही आकाश चोप्राने म्हटले आहे. पंजाबच्या संघात आधीपासूनच अनेक अष्टपैलू खेळाडू असल्याने संघनिवड करताना व्यवस्थापनाला योग्य संतुलन साधावे लागेल.

हार्दिक पांड्या फलंदाजीत लयीत असेल, तर तो एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्याच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते. मात्र, या संभाव्य ट्रेडमध्ये पंजाबपेक्षा मुंबई इंडियन्सला अधिक फायदा होईल, असे आकाश चोप्राने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Hardik Pandya Arshdeep Singh Mumbai Indians Punjab Kings Player Trade
Rohit Sharma Mumbai Indians captain 2027
Hardik Pandya Injury Update Out for Six Months
Hardik Pandya struggle story