Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

Goa Bus Driver Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पणजी येथील जलदगती विशेष पोक्सो न्यायालयाने ३७ वर्षीय खासगी बसचालकाला दोषी ठरवून १३ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Goa POCSO Court
Goa POCSO CourtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पणजी येथील जलदगती विशेष पोक्सो न्यायालयाने ३७ वर्षीय खासगी बसचालकाला दोषी ठरवून १३ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपी बसचालक म्हणून काम करत असल्याने आणि पीडित १६ वर्षीय मुलगी दररोज त्याच्या बसने प्रवास करत असल्याने दोघांची ओळख होती.

सरकारी पक्षाच्या युक्तिवादानुसार, १५ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपीने १६ वर्षे ९ महिने वयाच्या पीडितेला आपल्या मारुती-८०० कारमधून नेले. सुरुवातीला ती स्वतःच्या इच्छेने गाडीत बसली होती. मात्र, आरोपीने गाडीचे दरवाजे लॉक करून तिला डांबून ठेवले. त्यानंतर बांबोळी येथील महामार्गाजवळील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

त्याच दिवशी संध्याकाळी आरोपी दारूच्या नशेत पीडितेच्या घरी जाऊन गोंधळ घालू लागला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी पीडितेने आजीजवळ घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Goa POCSO Court
Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

पीडित मुलगी विशेष मुलगी असून तिची साक्ष खंबीर आणि विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले. साक्षीतील किरकोळ विसंगतींमुळे तिच्या मुख्य साक्षीच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाल्याने पीडितेच्या साक्षीला भक्कम आधार मिळाला.

रक्ताच्या नमुन्यांची साखळी तुटल्यामुळे न्यायालयाने डीएनए अहवालावर पूर्णपणे अवलंबून न राहण्याचे ठरवले. डीएनए हा पूरक पुरावा असतो; मात्र पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे गुन्हा नि:संशयपणे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

अपहरणाच्या आरोपातून सुटका

पीडित मुलगी स्वतःच्या इच्छेने आरोपीच्या कारमध्ये बसली होती. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ (अपहरण) अंतर्गत आरोपीला दोषी धरता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

मात्र, पीडितेची विश्वासार्ह साक्ष आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. दंडाची रक्कम वसूल झाल्यास ती पीडितेला भरपाई म्हणून दिली जाईल. तसेच ती गोवा व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीमअंतर्गत अतिरिक्त भरपाईसाठीही पात्र असेल.

Goa POCSO Court
Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

घेतला असाहाय्‍यतेचा गैरफायदा

शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी आरोपीच्या वर्तनावर गंभीर ताशेरे ओढले. आरोपी पीडितेपेक्षा कित्‍येक वर्षांनी मोठा असून विवाहित आहे. त्याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा आणि असाहाय्‍यतेचा गैरफायदा घेतला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता १३ वर्षांची सक्तमजुरी योग्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.