Ranji Trophy: गोव्याच्या सुयशची तडाखेबंद द्विशतकी खेळी

रणजी ट्रॉफीत राजस्थानविरुद्धच्या सामन्यातील कामगिरी
Suyash Prabhudesai
Suyash Prabhudesai Dainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy: सुयश प्रभुदेसाईने तिसऱ्या क्रमांकाला न्याय देताना धडाकेबाज द्विशतक ठोकले. अर्जुन तेंडुलकरने नाईट वॉचमन भूमिका व्यवस्थित वठवताना चमकदार शतक केले. त्यांनी सहाव्या विकेटसाठी दणकेबाज द्विशतकी भागीदारी केली. राजस्थानसाठी हा तडाखाच ठरला, त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने 8 बाद 493 धावा करून निर्विवाद वर्चस्व राखले.

Suyash Prabhudesai
IND vs BAN: शतक हुकलं, पण श्रेयस अय्यरने भारतासाठी केलाय मोठ्ठा विक्रम, सूर्यकुमारलाही टाकलं मागे

गोव्याची ही राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवसअखेर गोव्याचा डाव 5 बाद 210 असा गडगडला होता. सुयश पहिल्या दिवसअखेर 81 धावांवर खेळत होता. त्याने एकुण 705 मिनिटे किल्ला लढविताना 29 शैलीदार चौकारांच्या मदतीने 416 चेंडूंत 212 धावा केल्या.

द्विशतकी भागीदारी

सुयश व अर्जुन तेंडुलकर यांनी सहाव्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली. 310 मिनिटांतील 374 चेंडूंवरील मॅरेथॉन भागीदारी संपुष्टात आल्यामुळे 2010-11मध्ये जयपूर येथे गोव्यातर्फे राजस्थानविरुद्ध अजय रात्रा व राहुल केणी यांनी चौथ्या विकेटसाठी केलेला 310 धावांच्या अभेद्य भागीदारीचा विक्रम अबाधित राहिला.

Suyash Prabhudesai
Arjun Tendulkar: फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही चमकला अर्जुन, मिळवल्या 'या' महत्त्वाच्या विकेट्स

अर्जुन दुसरा गोमंतकीय

अर्जुन तेंडुलकरने (120) कारकिर्दीतील पहिल्याच रणजी क्रिकेट सामन्यात शतक झळकाविले. असा पराक्रम करणारा तो गोव्याचा अवघा दुसराच फलंदाज ठरला. सुमीरन आमोणकरने 2016-17 च्या मोसमात सेनादलाविरुद्ध कटक येथे पदार्पणाच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती. नाईट वॉचमन या नात्याने रणजी स्पर्धेत शतक करणारा अर्जुन गोव्याचा पहिला फलंदाज ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com