Goa Ranji Cricket: Shubham Ranjane
Goa Ranji Cricket: Shubham RanjaneDainik Goamantak

Goa Ranji Cricket: मुंबईचा शुभम रांजणे गोव्याकडून खेळण्यास इच्छुक

Goa Ranji Cricket: ‘पाहुणा’ खेळाडूच्या दोनजागेसाठी जोरदार चुरस
Published on

पणजीः गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात (Goa Ranji Cricket Team) रिक्त असलेल्या दोन ‘पाहुणा’ खेळाडूच्या जागेसाठी जोरदार चुरस आहे, त्यात मुंबईचा (Mumbai) अष्टपैलू शुभम रांजणे (Shubham Ranjane) याचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.`‘शुभम रांजणे, अरमान जाफर या मुंबईकर क्रिकेटपटूंसह गोव्याकडून खेळण्यासाठी काही अर्ज आले आहेत. इच्छुक क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमधील सक्रिय आहेत. आम्ही त्यांना चाचणीसाठी बोलावणार आहोत. मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई हे चाचणी घेतील आणि नंतर पाहुणा क्रिकेटपटू निवडला जाईल,’’ असे गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव विपुल फडके यांनी शुक्रवारी सांगितले. गतमोसमात खेळलेला मुंबईचा यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर याला जीसीएने संघात कायम ठेवले असून अमित वर्मा याचा करार संपुष्टात आणला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमानुसार एक संघ प्रत्येकी तीन पाहुणे क्रिकेटपटू खेळवू शकतो.

Goa Ranji Cricket: Shubham Ranjane
Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

प्राप्त माहितीनुसार, मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असलेला शुभम याचे नाव आघाडीवर आहे. गतमोसमात (2020-2021) शुभम मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत खेळला होता. तो 27 वर्षांचा असून 12 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने चार अर्धशतकांसह 513 धावा केल्या आहेत. याशिवाय पाच विकेटही टिपल्या आहेत. 18 लिस्ट ए (एकदिवसीय) सामन्यांत त्याने 193 धावा व नऊ गडी बाद केले असून 24 टी-20 सामन्यांत 16 विकेट मिळविल्या आहेत. पन्नासच्या दशकातील भारताचे माजी कसोटीपटू वसंत रांजणे यांचा शुभम नातू आहे. महाराष्ट्राकडून खेळलेले सुभाष रांजणे हे त्याचे वडील आहेत. शुभम वयोगट पातळीवर महाराष्ट्राकडून खेळला होता.

Goa Ranji Cricket: Shubham Ranjane
Goa Cricket: संभाव्य रणजी संघात नवोदितांनाही संधी

रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा माजी कसोटीपटू वासीम जाफर याचा अरमान हा पुतण्या आहे. डिसेंबर 2018 मध्ये 22 वर्षीय फलंदाज मुंबईकडून शेवटच्या वेळेस रणजी करंडक स्पर्धेत खेळला होता. पाच सामन्यांत त्याने फक्त 55 धावा केल्या आहेत. 2010 साली मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये डावात 498 धावांची विक्रमी खेळी करून प्रकाशझोतात आलेला अरमान नंतर सीनियर पातळीवर छाप पाडू शकला नाही.

Goa Ranji Cricket: Shubham Ranjane
Goa Cricket: प्रशिक्षक भास्कर यांचे मत ठरणार निर्णायक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com