India vs Sri Lanka: राहुल द्रविडने दीपक चहरला दिला होता कानमंत्र

India vs Sri Lanka: दीपक चहरच्या (Deepak Chahar) 69 धावा मालिका जिंक्यण्यास कामी आल्या. राहुल द्रविड (Rahul Dravid) ने फलंदाजी ला जाण्यापूर्वी काय कान मंत्र दिला हे ही सांगितलं.
India vs Sri Lanka: Deepak Chahar and Suryakumar Yadav during the second ODI on Tuesday
India vs Sri Lanka: Deepak Chahar and Suryakumar Yadav during the second ODI on TuesdayTwitter/@BCCI

भारत विरुद्ध श्रीलंकेतील (India vs Sri Lanka) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 गडी राखत विजय मिळवला. दीपक चहरच्या (Deepak Chahar) 69 धावा मालिका जिंक्यण्यास कामी आल्या तर सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) अर्धशतकी खेळीने देखील भारताच्या विजयला साथ दिली. श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचं आव्हान भारताने 5 चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.

भारत दुसऱ्या सामना हरताना दिसत असताना दीपक चहर ने आपल्या खेळीने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. गोलंदाजीसाठी ओळख असणाऱ्या चहर ने आपल्या फलंदाजी मध्ये पण कमाल दाखवली. नाबाद 69 धावांची खेळी करत चहरने भारताला हातातून निसटलेला सामना जिंकून देत मालिका देखील जिंकून दिली. या विजयानंतर दीपकने विजयाचं श्रेय दुसऱ्या तिसऱ्या ला न देता कोच राहुल द्रविडला दिलं आहे. त्यानी राहुल द्रविड ने फलंदाजी ला जाण्या पूर्वी काय कान मंत्र दिला हे ही सांगितलं.

India vs Sri Lanka: Deepak Chahar and Suryakumar Yadav during the second ODI on Tuesday
IND vs SL: चाहर-भुवीची कमाल, लोअर ऑर्डरनं जिंकलं !

“आपल्या देशासाठी सामना जिंकण्यासाठी यापेक्षा दुसरा मार्ग कोणता. राहुल सरांनी मला सर्व चेंडू खेळण्यास सांगितले. मी भारत अ बरोबर काही सामने खेळलो होतो तेव्हाही ते कोच होते. मला वाटते की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी मला सांगितले की त्यांना असे वाटते की मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो," चहर सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात म्हणाला.

“या विकेटवर धावांचा पाठलाग करणे सोपे होते. खेळताना माझ्या मनात फक्त एक गोष्ट चालू होती की मला असा डाव खेळायचा आहे ज्याचे मी स्वप्नं पहिले होते ज्याचे मी स्वप्न पाहिले आहे. जेव्हा 50 पेक्षा कमी धावा पाहिजे होत्या तेव्हा मला वाटलं की आपण हा सामना जिंकू," असं तो पुढे म्हणाला.

तत्पूर्वी श्रीलंकाने भारताला 276 धावांचं एक तगडं आव्हान दिलं. 276 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ अवघ्या 12 रन करून तंबूत परतला. भारताकडून शिखर धवन (29) आणि मनिष पांडे (37) यांनी धावा काढायची जिम्मेदारी स्वीकारली खरी पण ते फार काळ मैदानावर टिकले नाही. इशान किशन (1),हार्दिक पंड्या (0) यांनी देखील निराश केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com