Goa Cricket: पुनरागमनासाठी अमित यादव प्रयत्नशील

Goa Cricket: तंदुरुस्ती चाचणीनंतरच ऑफस्पिनरच्या निवडीचा मार्ग होणार मोकळा
Goa Cricket: Amit Yadav
Goa Cricket: Amit YadavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः गोव्यातर्फे चार वर्षांपूर्वी शेवटच्या वेळेस रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट खेळलेला अनुभवी ऑफस्पिनर अमित यादव (Amit Yadav) याने दुखापतीतून सावरल्यानंतर, संघ निवडीसाठी विचाराधीन घेण्याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनला (Goa Cricket Association) विनंती केली आहे. अमित यादव जीसीएच्या तंदुरुस्ती चाचणीत यशस्वी ठरला, तरच त्याचा निवडीसाठी विचार होईल, असे जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी सोमवारी स्पष्ट केले. 31 वर्षीय अमितला स्नायू तंदुरुस्ती, तसेच यो-यो चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागेल, त्यानंतर त्याला मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांचा विश्वासही संपादन करावा लागेल, असे विपुल यांनी नमूद केले. पाठदुखीमुळे त्रस्त झाल्याने अमितला मध्यंतरी चमक दाखवता आली नाही. त्यानंतर तो संघाबाहेर गेला. आता आपण पाठदुखीतून सावरलो असून तंदुरुस्त असल्याचे त्याने जीसीएला कळविले आहे, अशी माहिती जीसीए सचिवांनी दिली. अन्य खेळाडूंनाही पुनरागमन करताना तंदुरुस्ती चाचणी अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Cricket: Amit Yadav
Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

अवघा दुसरा फिरकीपटू

अमित मूळ दिल्लीचा, पण वयोगट स्पर्धेपासून गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बंदीमुळे 2012-13 मोसम वगळता तो गोव्याकडून 2009 ते 2017 या कालावधीत गोव्यातर्फे रणजी करंडक स्पर्धेत आठ मोसम खेळला आहे. अमितने गोव्याकडून खेळताना 37 रणजी सामन्यांत 123 गडी बाद केले आहेत. रणजी क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे चौघांनी शंभरपेक्षा जास्त गडी बाद केले आहेत. त्यात शदाब जकाती (90 सामन्यांत 271 विकेट) व अमित हे दोघेच फिरकीपटू आहेत. अमितने नोव्हेंबर 2009 मध्ये नागपूर येथे विदर्भाविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये तो पर्वरी येथे पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला.

Goa Cricket: Amit Yadav
Goa Ranji Cricket: मुंबईचा शुभम रांजणे गोव्याकडून खेळण्यास इच्छुक

वेगवान गोलंदाज विचाराधीन

आगामी मोसमात पाहुणा क्रिकेटपटू निवडताना जीसीए मध्यमगती-वेगवान गोलंदाजासाठी विचाराधीन असल्याची माहिती आहे. जीसीएकडे बरेच अर्ज आले आहेत. त्यात मुंबईचा शुभम रांजणे याच्याव्यतिरिक्त दिल्लीचा सुबोध भाटी, महाराष्‍ट्राचा समद फल्लाह, विदर्भाचा श्रीकांत वाघ या प्रमुख गोलंदाजांचे अर्ज आहेत. फल्लाह 26 वर्षांचा असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र इतरांच्या निवडीबाबत प्रशिक्षक भास्कर पिल्लई तंदुरुस्ती चाचणीनंतर निर्णय घेतील.

Goa Cricket: Amit Yadav
Goa Cricket: संभाव्य रणजी संघात नवोदितांनाही संधी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com