
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुंबईतील गोवन क्लब वाचवण्यासाठी लढणाऱ्या गोमंतकीयांसाठी कायदेशीर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईतील हे क्लब गोव्यातून सुरुवातीच्या काळात कामाधंद्याच्या शोधात गेलेल्या गोमंतकीयांसाठी निवाऱ्याचं ठिकाण होतं. मात्र आता ते क्लब वाचवण्यासाठी झगडावं लागत आहे. आमदार एल्टन डिकोस्ता यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात नोकरीच्या शोधात गोव्यातून मुंबईत आलेल्या गोमंतकीयांसाठी गोवन क्लब हे हक्काचे घर होते. या क्लबमध्येच राहून गोव्यातील गायक, संगीतकार, उद्योगपतींसह अनके बड्या लोकांनी मुंबई (Mumbai) सारख्या मायानगरीत आपलं स्वत:च अस्तित्व निर्माण केलं. मुंबईत या गोवन क्लबनी स्वत:ची एक संस्कृती निर्माण केली होती. मात्र आता या क्लबसाठी कायदेशीर लढाई लढण्याची वेळ आलीय. मुंबईत हे क्लब धोबीघाट, चिरा बाजार, माझगाव आणि इतर अनेक ठिकाणी आहेत. मुंबईतील या गोवन क्लबबद्दल स्थानिक माध्यमांसह राष्ट्रीय माध्यमांमध्ये बरेच काही लिहिले गेले.
आमदार एल्टन डिकोस्ता यांनी सभागृहात झिरो अव्हरमध्ये बोलताना गोवन क्लबचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईतील धोबीघाट, जिरा बाजार, माझगाव आणि इतर ठिकाणी असलेले गोवन क्लब कोसळण्याच्या वाटेवर असल्याचे डिकोस्ता म्हणाले. डिकोस्ता म्हणाले की, ''बांधकाम व्यावसायिकांकडून बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आलेल्या या हेरिटेज क्लबचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत. या बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध काही क्लब गेल्या 10 वर्षांपासून न्यायालयीन लढा लढत आहेत.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.