Goa Assembly Monsoon Session: गोव्यात देशातील पहिले 'ग्रंथालय धोरण' राबवणार- मंत्री गावडे

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: कला आणि संस्कृती विभागाने संस्कृती जतनासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी 600 गट आणि संस्थांना आर्थिक पाठबळ दिले.
Goa Assembly Monsoon Session: गोव्यात देशातील पहिले 'ग्रंथालय धोरण' राबवणार- मंत्री गावडे
Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात देशातील पहिले 'ग्रंथालय धोरण' राबवणार- मंत्री गावडे

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या मुद्यावरुन आक्रमक असतानाचा सावर्जनिक बांधकाम मंत्री गोविंद गावडे यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. गावडे म्हणाले की, ''कला आणि संस्कृती विभागाने संस्कृती जतनासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी 600 गट आणि संस्थांना आर्थिक पाठबळ दिले.''

गावडे पुढे म्हणाले की, "गोव्याच्या कानाकोपऱ्यात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यात 78 ग्रंथालये स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रंथालय धोरण अंतिम टप्प्यात आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर यास अंतिम रुप मिळेल. हे देशातील पहिले ग्रंथालय धोरण ठरेल. याशिवाय, राज्यभरातील रवींद्र भवनांचे नूतनीकरण केले जाईल.''

कला अकादमीच्या मुद्यावरुन आलेमाव आक्रमक

कला अकादमीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही सावंत सरकारला निशाण्यावर घेतले. आलेमाव म्हणाले की, कला अकादमी केवळ खराब स्थितीतच नाही तर ती लक्षणीयरीत्या खालावली आहे. आम्ही जेव्हा कला अकादमीला भेट दिली तेव्हा तेथील निकृष्ट दर्जाचे काम पाहून निराशा झाली. तिथे मूलभूत सुविधा देखील नाहीयेत. सरकार या मूलभूत सुविधा पुरवण्यात देखील अपयशी ठरले.

कला अकादमीच्या वादामुळे कला आणि संस्कृती विभागाची प्रतिष्ठा डागाळली

कला अकादमीच्या मुद्यावरुन गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सरकावर हल्ला केला.

सरदेसाई म्हणाले की, ''कला अकादमीच्या वादामुळे कला आणि संस्कृती विभागाची प्रतिष्ठा डागाळली आहे. कला अकादमीच्या दयनीय अवस्थेबद्दल विशेषत: कलाकारांसाठी पुरेशा सुविधांचा अभाव याबद्दल मी चिंतित आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कला अकादमीच्या सर्वसमावेशक ऑडिटची मागणी करतो."

सरकारची ग्रामीण विकास यंत्रणा सपशेल फेल - विरेश बोरकर

सरकारची ग्रामीण विकास यंत्रणा सपशेल फेल झाली आहे. गावांचा विकास करण्यासाठी बनवलेल्या या यंत्रणेकडे निधी व कर्मचारी वर्गच नाही त्यामुळे प्रस्तावित कामे रखडली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी यात लक्ष घालावे असे आमदार विरेश बोरकर यांनी सभागृहात सांगितले

'सॅपेक टॅकरो'च्या संपूर्ण टीममध्ये बिगरगोमंतकीय; कार्लुस फेरेरा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील 'सॅपेक टॅकरो'च्या संपूर्ण टीममध्ये बिगरगोमंतकीय खेळाडू होते. यात गोमंतकीय खेळाडूंना डावलण्यात आले. इतर राज्य कधीच गोमंतकीयांना त्यांच्या राज्यासाठी नेतृत्व करु दिल नसते, असे आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले.

शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश

पावसामुळे तंवशी व पिपरी उत्पादकांना नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सगळ्या विभागीय कृषी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आज सभागृहात दिले.

काही शेतकरी कमुनिदाद जागेत गेल्या २०-२५ वर्षांपासून तंवशी, पिपरी, जायांची फुले अश्या प्रकारची हंगामी शेती करतात. त्यांना गृहित धरून कमुनिदादीने त्यांच्या शेतीवर हरकत घेऊ नये जेणे करून पुढे नुकसान झाले तर त्यांना विमा योजना देता येईल अशी विनंती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सभागृहात केली.

गेल्यावर्षी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना ७ ऑगस्ट पुर्वी सर्व नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले.

पंधरा दिवसांच्या मुसळधार पावसात शेतकऱ्यांचे नुकसान, नुकसान भरपाईच्या मागणीसाठी निलेश काब्राल यांची लक्षवेधी

पंधरा दिवसांच्या मुसळधार पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी निलेश काब्राल यांनी लक्षवेधी मांडली. राज्यातील फार्मागुढी, बांदोडा, फोंडा आणि केपे तालुक्यातील पारंपरिक शेतकऱ्यांच्या काकडी, कारली, दोडका, वांगी, मुळा, भोपळा यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याचे काब्राल यांनी म्हटले.

गोपकपट्टणम बंदर ऐतिहासिक स्मारक; डागडुजीसाठी काय पावले उचलली? बोरकरांचा प्रश्न

गोपकपट्टणम बंदर हे एक महत्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक आहे. रामायण व महाभारतात सुध्दा याचा उल्लेख आढळून येतो. गेली ६ वर्षे या बंदराची डागडुजी करू असे आश्वासन सरकार देत आहे.

हे बंदर राखून ठेवण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहे आणि हे करायला सरकारकडे पुरेसा कर्मचारी वर्ग आहे का असा प्रश्न आमदार विरेश बोरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला.

एका कॅबिनेटच्या निर्णयामुळे राज्याचे 200 कोटी बुडाले!

कॅबिनेट बैठकीत मोपा विमानतळाच्या Concession Agreement मध्ये दुरुस्ती करून सरकारने GMR चा Revenue Holiday वाढवला. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत येणारे 200 कोटी रुपये बुडाले. प्रमोद सावंत असे करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री असतील. विजय सरदेसाईंचा विधानसभेत गंभीर आरोप.

मंत्री, सभापतींना 'आरे'... 'तुरे'... साळकरांनी घेतला आक्षेप

सभागृहात बोलताना काही सदस्य मंत्री आणि सभापतींना देखील 'आरे'... 'तुरे'... भाषा वापरतात याला वास्को आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी आक्षेप घेतला. तसेच, अशी भाषा वापरु नये अशी विनंती केली. मुख्यमंत्री सावंत यांनी याला समर्थन दिले तर या गोष्टीची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन सभापतींनी केले.

काँग्रेसने राज्याचा दर्जा दिला म्हणून सावंत मुख्यमंत्री

काँग्रेसने गोव्याला राज्याचा दर्जा दिला म्हणून आज प्रमोद सावंत आज मुख्यमंत्री होऊ शकले, असा टोला एल्टन डिकॉस्ता यांनी काँग्रेसने काही केले नाही या आरोपाल उत्तर देताना लगावला.

Goa Assembly Monsoon Session 2024 Today Live | Watch Here

विधानसभा अधिवेशनाचा तिसरा आठवडा; कला अकादमीचा मुद्दा गाजणार

गोवा विधानसभा अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु झाला असून, अकराव्या दिवशी सभागृहा क्रीडा आणि कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या खात्यासंबधित सूचना मागण्या सत्रात चर्चा होईल. यात कला अकादमीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com