IPL 2022: गौतम का झाला होता विराटबाबत 'गंभीर'

गौतम गंभीरने 2013 मध्ये विराट कोहलीसोबत झालेल्या वादाची आठवण करून दिली आहे.
IPL 2013
IPL 2013Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावणारा दोन वेळा आयपीएल चॅम्पियन कर्णधार गौतम गंभीरने 2013 मध्ये विराट कोहलीसोबत झालेल्या वादाची आठवण करून दिली आहे. वास्तविक, दिल्लीच्या दोन खेळाडूंमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान मैदानावरती बाचाबाची झाली होती. (Gautam Gambhir and Virat Kohli had an argument during the IPL in 2013)

IPL 2013
ICC Women's World Cup: भारताचं भविष्य आता पाकिस्तानच्या हातात, जाणून घ्या

ज्याचा बचाव दिल्ली रणजी संघातील सहकारी रजत भाटियाने केला होता. त्यावेळी गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता आणि विराट कोहली पहिल्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार होता.

गंभीर म्हणाला की त्याला स्पर्धा आवडते

त्या घटनेची आठवण करून देताना लखनौ सुपर जायंट्स संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर म्हणाले की, त्यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये कोणतीही वैयक्तिक प्रतिक्रिया नव्हती. गौतम गंभीर म्हणाला की, 'असे अनेकदा घडते, आणि मला ते खूप आवडते. मला ती स्पर्धा आवडते, आणि मला स्पर्धात्मक लोक आवडतात. एमएस धोनी आपल्या पद्धतीने प्रतिस्पर्धी खेळाडू आहे, विराट त्याच्या पद्धतीने प्रतिस्पर्धी आहे. कधीकधी जेव्हा तुम्ही संघाचे नेतृत्व करत असता तेव्हा तुम्हालाही ते करावे लागते.

IPL 2013
Kerala Blasters VS Hyderabad FC: आयएसएलला मिळणार नवा विजेता

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील या सामन्यात आरसीबीने केकेआरचा 8 गडी राखून पराभव केला होता. विराट कोहली या सामन्यात 27 चेंडूत 35 धावा करून बाद झाला होता. विराट कोहलीच्या विकेटनंतर दोन्ही कर्णधारांमध्ये वाद झाला, त्यानंतर कोलकाताचा अष्टपैलू रजत भाटिया आला आणि दोघांना एकमेकांपासून दूर घेऊन गेला. या प्रकरणाची आठवण करून देत गौतम गंभीर म्हणाला की, त्यावेळी आमच्यात वैयक्तिक असे काही नव्हते आणि आताही नाहीये.

कोलकात्याचा माजी कर्णधार गौतम गंभीर म्हणाला की, 'म्हणून आमच्यामध्ये वैयक्तिक असे काहीही नव्हते आणि कधी होणारही नाहीये. कर्णधार म्हणून कधी कधी तुम्ही वैयक्तिक संबंधांचा विचार करत नाही, फक्त तुम्ही संघाचे कर्णधार आहात तर तुम्हाला हे करावे लागतेच. कोहलीने गेल्या वर्षी आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता, तर गंभीर सध्या लखनऊशी एक मार्गदर्शक म्हणून जोडले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com