Kerala Blasters VS Hyderabad FC: आयएसएलला मिळणार नवा विजेता

अंतिम लढत : विजेतेपदासाठी आज केरळा ब्लास्टर्सला हैदराबादचे आव्हान
Kerala Blasters VS Hyderabad FC
Kerala Blasters VS Hyderabad FCDainik Gomantak

Kerala Blasters VS Hyderabad FC: इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी (ता. 20) नवा विजेता मिळणार आहे. अंतिम लढतीतील प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्स व हैदराबाद एफसी यांनी यापूर्वी एकदाही स्पर्धा जिंकलेली नाही.

आठव्या आयएसएल (ISL) स्पर्धेचा अंतिम सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. सलग तिसऱ्या वर्षी, तर एकंदरीत चौथ्यांदा गोव्यात स्पर्धेची अंतिम लढत होत आहे. मागील दोन वर्षे कोविड-19 (Corona) मुळे रिकाम्या स्टेडियमवर लढती झाल्या, मात्र यंदा महामारी आटोक्यात आल्यामुळे स्टेडियम दोन्ही संघांचे पाठिराखे दिसतील. गोवा सरकारच्या कोविड-19 तज्ज्ञ समितीने स्टेडियमवर शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेस परवानगी दिली आहे. (Kerala Blasters VS Hyderabad FC match in Indian Super League)

Kerala Blasters VS Hyderabad FC
वाळपईत पावसाच्या सरी, हवामान विभागाने सकाळीच वर्तवला होता अंदाज

केरळा ब्लास्टर्स दोन वेळा उपविजेते

केरळा ब्लास्टर्सने (Kerala Blasters) यापूर्वी दोन वेळा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे, पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2014 व 2016 मध्ये दोन्ही वेळेस त्यांना एटीके संघाने हरविले. आता तिसऱ्या वेळेस नशिबवान ठरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 44 वर्षीय सर्बियन प्रशिक्षक इव्हान व्हुकोमोनोविच यांच्या मार्गदर्शनाखाली केरळा ब्लास्टर्सने साखळी फेरीत चौथा क्रमांक मिळविला, नंतर दोन टप्प्यातील उपांत्य फेरीत लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या जमशेदपूर एफसीवर गोलसरासरीत 2-1 फरकाने मात केली. उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात महत्त्वपूर्ण गोल केलेल्या सहल अब्दुल समद याची तंदुरुस्ती केरळा ब्लास्टर्ससाठी रविवारी निर्णायक असेल.

हैदराबाद प्रथमच अंतिम फेरीत

स्पेनचे 53 वर्षीय मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसी (Hyderabad FC) प्रथमच आयएसएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत आहे. मार्केझ यांचा प्रशिक्षक या नात्याने हा दुसरा मोसम आहे. साखळी फेरीत उपविजेतेपद मिळविल्यानंतर हैदराबादने उपांत्य फेरीत गतउपविजेत्या एटीके मोहन बागानला गोलसरासरीत 3-2 फरकाने हरविले. स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत 46 गोल केले आहेत, त्यामुळे केरळा ब्लास्टर्सला सावध राहावे लागेल. फातोर्डा येथे ते सलग 9 सामने (3 विजय, 6 बरोबरी) अपराजित आहेत.

प्रमुख खेळाडू

हैदराबादसाठी गोल्डन बूटचा प्रमुख दावेदार नायजेरियाचा बार्थोलोम्यू ओगबेचे प्रमुख खेळाडू आहे. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 18 गोल नोंदविले आहेत. स्पेनचा हावियर सिव्हेरियो (7 गोल) व ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर (5 गोल) यांच्यावरही त्यांची आक्रमणात मदार राहील. गोलरक्षणात लक्ष्मीकांत कट्टमनी याने छाप पाडली असून त्याने स्पर्धेत 58 फटके अडविले आहेत. केरळा ब्लास्टर्स आक्रमणात स्पॅनिश अल्वारो व्हाझकेझ (8 गोल), अर्जेंटिनाचा जॉर्जे परेरा डायझ (8 गोल), उरुग्वेयन अॅ्ड्रियन लुना (6 गोल, 7 असिस्ट), तसेच सहल अब्दुल समद (6 गोल) यांच्यावर अवलंबून असेल. 21 वर्षीय युवा गोलरक्षक प्रभसुखन गिल मोसमात उल्लेखनीय ठरला.

आकडेवारी

- हैदराबाद एफसी व केरळा ब्लास्टर्स यांच्यात 6 सामने, दोन्ही संघांचे प्रत्येकी 3 विजय

- 2021-22 मोसमात 2 सामने, पहिल्या केरळा ब्लास्टर्स 1-0, तर दुसऱ्या टप्प्यात हैदराबाद 2-1 फरकाने विजयी

- मोसमात हैदराबादचे 46, तर केरळा ब्लास्टर्सचे 36 गोल

- फातोर्डा येथील 10 लढतीत हैदराबादचे 3 विजय, 6 बरोबरी, 1 पराभव

- केरळा ब्लास्टर्सचे फातोर्डा येथे 14 सामने, 3 विजय, 2 बरोबरी, 9 पराभव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com