

कोलकाता: आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) शानदार विजय मिळवला असला, तरी त्यांच्या एका महत्त्वाच्या खेळाडूला हा विजय महागात पडला आहे. हैदराबादचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याला बीसीसीआयने (BCCI) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कडक शिक्षा सुनावली आहे.
ईडन गार्डन्सवर २ एप्रिल रोजी पार पडलेल्या या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या २१ चेंडूत ४८ धावांची वादळी खेळी केली. मात्र, बाद झाल्यानंतर त्याने मैदानात जे वर्तन केले, ते आयपीएलच्या शिस्तीत बसणारे नव्हते. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अभिषेक शर्माने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केले आहे. हे कलम मैदानात असभ्य किंवा अश्लील भाषेचा वापर करण्याशी संबंधित आहे.
अभिषेक शर्माने आपली चूक मान्य केली आहे. या चुकीसाठी त्याच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. तसेच, त्याच्या शिस्तभंग अहवालात एक 'डिमेरिट पॉईंट' देखील जोडण्यात आला आहे. भविष्यात अशाच चुका पुन्हा झाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी देखील येऊ शकते.
दुसरीकडे, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याला देखील बीसीसीआयने मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. ३१ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब संघाने संथ गतीने षटके (Slow Over Rate) टाकल्याचे समोर आले. नियमांनुसार, ठरलेल्या वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड सोसावा लागला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.