Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

Foreign job scam colva goa: विदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार युवक-युवतींना लाखोंचा गंडा घालण्याची घटना कोलवा येथे घडली आहे.
Foreign job scam colva goa
Foreign job scam colva goaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: विदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार युवक-युवतींना लाखोंचा गंडा घालण्याची घटना कोलवा येथे घडली आहे. गुरुवारी बाणावलीचे आमदार वेन्झी व्हियेगस यांनी फसविले गेलेल्यांसोबत मडगाव पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

मोसमी खान पेरेरा या महिलेने ही फसवणूक केल्याचा आरोप असून ती नावेली येथे राहात असल्याचे व्हियेगस यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण ९ जणांना या संशयित महिलेने २,९१,१७६ रुपयांचा गंडा घातला आहे. तिच्याकडून फसविले गेलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Foreign job scam colva goa
'कॉल रेकॉर्डस्‌' तपासण्यास पोलिस का घाबरतात? वेश्या व्यवसायाविरुद्ध संतप्त हरमलवासीय एकवटले, पोलिसांना अल्टिमेटम

बेल्जियममध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयित महिलेने एप्रिल २०२४ मध्ये संबंधितांकडून रक्कम उकळली होती. या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असली तरी अद्याप कुणालाही विदेशात पाठविण्यात आलेले नाही.

Foreign job scam colva goa
Goa Job Scam: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून 'इतक्या' लाखांचा गंडा; वार्का येथील रहिवाशाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आलेली नाही. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी प्रथम कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com