IPL 2026: चेन्नईचं टेन्शन वाढलं! प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर असतानाच 'या' स्टार खेळाडूने सोडली टीमची साथ, कारण काय?

Jamie Overton ruled out of IPL 2026: आयपीएल २०२६ चा थरार आता निर्णायक वळणावर पोहोचला असताना, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.
Jamie Overton ruled out of IPL 2026
Jamie Overton ruled out of IPL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल २०२६ चा थरार आता निर्णायक वळणावर पोहोचला असताना, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य अस्त्र मानला जाणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून तो उपचारांसाठी युनायटेड किंगडममध्ये परतला आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या चेन्नईसाठी हा मोठा तांत्रिक आणि मानसिक धक्का मानला जात आहे.

ओव्हरटनच्या दुखापतीमुळे चेन्नईचे समीकरण बिघडले

चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी अधिकृत माहिती देताना सांगितले की, जेमी ओव्हरटनच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. पुढील वैद्यकीय तपासणी आणि व्यवस्थापनासाठी तो मायदेशी परतत आहे.

ओव्हरटनने या हंगामात १० सामन्यांत १४ बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. जरी त्याचा इकॉनॉमी रेट ८.८९ राहिला असला, तरी कठीण प्रसंगी विकेट घेण्याची त्याची क्षमता चेन्नईसाठी फायदेशीर ठरली होती. त्याच्या जाण्याने आता उर्वरित तीन सामन्यांत गोलंदाजीची धुरा कोणाकडे सोपवायची, हा मोठा प्रश्न कर्णधारासमोर असेल.

Jamie Overton ruled out of IPL 2026
Goa Politics: मनोजनंतर अजयकडूनही सोशल मीडियाद्वारे 'बाण'; 'आरजी'त 'उजो'; कार्यकर्त्यांच्‍या ब्रेनवॉशचा आरोप

विजयाचा शिल्पकारच संघाबाहेर

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात ओव्हरटनच चेन्नईच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला होता. एकाच षटकात त्याने फॉर्मात असलेला जोश इंग्लिस आणि कर्णधार ऋषभ पंत यांना बाद करून लखनऊच्या धावसंख्येला लगाम घातला होता. ३६ धावांत ३ बळी घेणाऱ्या ओव्हरटनला त्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले होते. अशा फॉर्मात असलेल्या खेळाडूचे संघातून बाहेर जाणे चेन्नईच्या रणनीतीला खिंडार पाडणारे आहे.

Jamie Overton ruled out of IPL 2026
Goa Crime: गोवा हादरला! आधी पैशांचं आमिष, मग अत्याचार अन् मारहाण; 60 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुखापतींचे ग्रहण आणि 'धोनी'ची प्रतीक्षा

चेन्नई सुपर किंग्ससाठी हा हंगाम दुखापतींच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी ठरत आहे. जेमी ओव्हरटनच्या आधी रामकृष्ण घोष, नॅथन एलिस, आयुष म्हात्रे आणि खलील अहमद हे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. आता चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्ससारख्या बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. ओव्हरटनच्या अनुपस्थितीत हे आव्हान पेलणे चेन्नईसाठी 'लोखंडी चणे' चावण्यासारखे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com