

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांनी मंगळवारी स्वत:हूनच पक्षाला बाधक ठरत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर सोशल मीडियाद्वारे हल्लाबोल केल्यानंतर, पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांनी आज बुधवारी परब यांची ‘धार’ कायम ठेवली. सांत-आंद्रे मतदारसंघातील आरजीपी कार्यकर्त्यांचा ‘ब्रेनवॉश’ लुसिओ रॉनकॉन यांनी केल्याचा दावा त्यांनी केल्यामुळे ‘आरजीपी’तील ‘उजो’ कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा यांच्यावरील कारवाईनंतर ‘आरजीपी’त अंतर्गत कलह माजला आहे. आल्मेदा हे पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांच्या जवळचे असल्यामुळे ते आता याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु, बोरकर यांनी या विषयावर बोलणे टाळत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे काहीच दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.
त्यानंतर मनोज परब आणि वीरेश बोरकर यांनी अंतर्गत कलहाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु, मंगळवारी आक्रमक होत परब यांनी सोशल मीडियाद्वारे सेंट लॉरेन्सच्या जिल्हा पंचायत सदस्य तृप्ती बकाल यांच्यासह आदित्य देसाई, मयुरेश साळगावकर, लुसिओ रॉनकॉन, आश्लोन रॉड्रिगीस, तिओतोनियो कॉस्ता यांच्यावर सडकून टीका केली.
खजिनदार अजय खोलकर यांनी परब यांच्या या कृतीचे समर्थन केले होते. दरम्यान, खोलकर यांनी आज ‘सांत-आंद्रेतील आरजीपी कार्यकर्त्यांचे ब्रेनवॉश लुसिओ रॉनकॉन यांच्याकडून झाले आहे. आजच्या जगात मुत्सद्दी असण्याला नम्रता म्हणतात आणि स्पष्टवक्तेपणाला अहंकार म्हणतात’, अशी पोस्ट जारी केली. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांतही संभ्रम पसरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.