Bangladesh Premier League: इंग्लंडच्या खेळाडूची बॉल टॅम्परिंग, टीमवर कारवाई

लीगमध्ये खेळणारा संघ सिलहट सनरायझर्स आणि त्यांचा अष्टपैलू रवी बोपारा बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळला.
Ravi Bopara
Ravi BoparaDainik Gomantak
Published on
Updated on

बॉल टॅम्परिंग. हे शब्द ऐकल्यावर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथचा (Steve Smith) जोहान्सबर्ग कसोटीचा प्रसंग डोळ्यापुढे येतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या तीन क्रिकेटर खेळाडूंवर मोठी कारवाई केली होती. आता अशीच एक घटना बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये घडली, या लीगमध्ये बॉल टॅम्परिंग म्हणजेच बॉलच्या कंडीशनशी छेडछाड होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात आहे. लीगमध्ये खेळणारा संघ सिलहट सनरायझर्स आणि त्यांचा अष्टपैलू रवी बोपारा बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळला, त्यानंतर अंपायरने त्यांच्यावर मोठी कारवाई केली. खुलना टायगर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सिलहेड सनरायझर्स संघाने चेंडूशी छेडछाड केली होती.

Ravi Bopara
ओडिशाचा ‘प्ले-ऑफ’साठी दावा कायम

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू रवी बोपाराने (Ravi Bopara) 9व्या ओव्हरमध्ये चेंडूशी छेडछाड केली, लीगच्या प्रसारकांनी त्या घटनेचे रिप्ले दाखवले ज्यामध्ये बोपारा त्याच्या बोटांनी चेंडू स्क्रॅच करत होता. ओव्हरच्या दरम्यान, जेव्हा ऑनफिल्ड पंच महफुजुर रहमान आणि प्रगीथ रामबुकवेला यांना बोपाराच्या या कृतीबद्दल कळले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून चेंडू काढून घेतला.

क्रिकेटच्या कायद्यांतर्गत, बोपाराची कारवाई कलम 41.3.5 नुसार दोषी आढळली, ज्यानुसार खेळाडूने बॉल सोबत छेडछाड केली आहे असे मानल्यास अंपायर चेंडू बदलू शकतात. या सामन्यातही तेच पाहायला मिळाले. बोपाराकडून चेंडू घेतल्यानंतर अंपायरने लगेच चेंडू बदलला. याशिवाय सिलहट सनरायझर्स संघाला 5 धावांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Ravi Bopara
सिलेक्टरच्या निवडीवर संघाचा विश्वास नाही? दीपक हुडाला संधी नाही

फील्ड अंपायर या घटनेची तक्रार मॅच रेफरीला देऊ शकतात, त्यानंतर खेळाडूवर कठोर कारवाई केली जाऊ शकते, असेही त्या नियमांमध्ये म्हटले आहे. मोठी गोष्ट म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू रवी बोपाराने या सामन्यात संघाचे कर्णधारपद सांभाळत असताना ही चूक केली, या सामन्यासाठी त्याने मोसाद्देक हुसेनची कर्णधारपदाची धुरा सोपवली होती.

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (Bangladesh Premier League) 65 सामने खेळल्यानंतर बोपाराने कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ होती, आणि त्याच्या कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात तो बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळला होता. मात्र, या घटनेनंतर तो पुन्हा सामन्यात गोलंदाजी करताना ही दिसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com