सिलेक्टरच्या निवडीवर संघाचा विश्वास नाही? दीपक हुडाला संधी नाही

अष्टपैलू म्हणून गोलंदाजी करण्याची संधी हुडाला न मिळणे प्रश्न निर्माण करत आहे.
Deepak Hooda
Deepak Hooda Dainik Gomantak
Published on
Updated on

Ind Vs Wi Deepak Hooda: टीम इंडियाने अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जिंकला. भारतीय संघाने हा सामना सहज जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. मात्र यादरम्यान एक गोष्ट सर्वांनाच खटकली ती म्हणजे अष्टपैलू खेळाडूच्या विषयावर सुरू असलेली चर्चा. या सामन्यात दीपक हुडाने पदार्पण केले, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे.

दीपक हुडा फलंदाजी करत नाबाद राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. पण जेव्हा टीम इंडिया बॉलिंग करत होती, तेव्हा दीपक हुडाला बॉलिंगची संधी मिळाली नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या संघाला 176 धावांवर रोखले असेल, पण त्यानंतरही अष्टपैलू म्हणून गोलंदाजी करण्याची संधी हुडाला न मिळणे प्रश्न निर्माण करत आहे.

Deepak Hooda
शोएब अख्तर लतादीदींना आई म्हणाला...

व्यंकटेशलाही मिळाली नव्हती संधी

हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर टीम इंडिया अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत टीम इंडियाने व्यंकटेश अय्यरला संधी दिली होती. त्यानंतर व्यंकटेशलाही गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकली नाही. पण दक्षिण आफ्रिका मालिकेत चांगली कामगिरी न केल्यामुळे व्यंकटेश अय्यरला वनडे संघातून वगळण्यात आले, तर तो टी-20 संघात कायम आहे. अष्टपैलू खेळाडूच्या शोधात दीपक हुडाला संधी मिळाली, पण गोलंदाजी करता आली नाही. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

Deepak Hooda
चक दे इंडिया फिव्हर; बॅटर जेमिमा रॉड्रिग्ज हॉकी स्टिकसह उतरणार मैदानात

आकाश चोप्राने ट्विट करून लिहिले की, 'पहिले व्यंकटेश अय्यर आणि आज हुड्डा. गोलंदाजीला संधी दिली नाही तर असा अष्टपैलू खेळाडू बनवणे कठीण होईल. किंवा निवड समितीकडून ज्या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली जात आहे, त्यांच्या गोलंदाजीच्या क्षमतेवर संघ व्यवस्थापनाला विश्वास नाही. अहमदाबाद वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपक हुडाने रविवारी 32 चेंडूत 26 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने दोन चौकारही मारले. दीपकसह सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com