मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्या शानदार खेळीच्या बळावरती पाकिस्तानच्या (Pakistan) संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) कसोटी अनिर्णित राखली गेली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामनाही अनिर्णित राहिला होता. बाबरच्या 196 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानला दुसऱ्या डावात 400 धावांचा टप्पा ओलांडता आला. पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावरती संघाचे जोरदार कौतुक करत आहेत. संघाचा अनुभवी तेज शोएब अख्तरही आपल्या संघाच्या कामगिरीवरती खूश आहे पण त्याने सामन्याच्या खेळपट्टीबाबत पीसीबीवरती प्रश्न उपस्थित केले. (Australia should not be exhausted Shoaib Akhtar)
दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी जोरदार धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात 556 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पाकिस्तानने दुसऱ्या डावात 443 धावा केल्या. शोएबचा असा विश्वास आहे की पीसीबीने अशी खेळपट्टी बनवली ज्यावरती खूप धावा झाल्या पण निकाल लागला नाहीये. अख्तरचे मत असे आहे की, संघ अनिर्णित राहण्यापेक्षा हरला असता तर बरे झाले असते. निदान त्यांनी यातून काही तरी शिकले असते.
खेळपट्टीबाबत अख्तरने पीसीबीचा क्लास घेतला आहे,
शोएब अख्तरने संघाच्या पराभवानंतरचा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केला, ज्यामध्ये त्याने पीसीबीला टीकेला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज म्हणाला की, 'तुम्ही जी विकेट घेतली आहे, ती पाहून कोणीही झोपू शकेल. मग अशी दमलेली विकेट घेऊन काय सिद्ध करायचे होते? तुमच्याकडे शाहीन आफ्रिदीसारखे वेगवान गोलंदाज आहेत, मग यावरती तुमचे काय विचार आहेत. माझ्या वेळेलाही असे व्हायचे होते.
ते पुढे म्हणाले, 'तिसर्या कसोटीसाठी अशी खेळपट्टी बनवण्याची गरज आहे ज्यात, हरल्या नंतरही निकाल मिळेल. आपण गमावल्यास काय होईल? आपण काहीतरी शिकू, निदान काहीतरी बरोबर करूयात. तुम्ही 500 धावा करत आहात, भारत दौऱ्यात जशी खेळपट्टी बनवली जात होती. ते लोक यायचे आणि 500-500 धावा काढून जायचे. सेहवागह हा तर एकटा 300 धावा काढायचा. मला त्यांचे श्रेय फलंदाजांकडून घ्यायचे नाही पण तुम्ही गोलंदाजांसाठीही काहीतरी सोडा असंही ते यावेळी म्हणाले.
बाबर आझमच्या खेळीचे देखील कौतुक केले
त्याने 196 धावांची खेळी करणाऱ्या बाबर आझमचे देखील यावेळी कौतुक केले आहे. शोएब म्हणाला की, 'बाबरने सर्वांना शानदार खेळ दाखवला आहे. तो पाकिस्तान तर सुपरमॅन आहे, ते पाहून मुलं क्रिकेट खेळायला लागतील. त्याला द्विशतक करता आले नाही याचे मला दु:ख आहे. देशाला येणाऱ्या काळात अनेक नवे खेळाडू मिळतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.