आप कडून हरभजन सिंग राज्यसभेवर?

आम आदमी पार्टी (AAP) माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला पंजाबमधून द्विवार्षिक निवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे.
Harbhajan Singh
Harbhajan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू असणाऱ्या हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नवनिर्वाचित आप सरकार क्रीडा विद्यापीठाची कमानही हरभजन सिंगकडे (Harbhajan Singh) देऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Harbhajan Singh
पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते भगवंत मान यांनी घेतली शपथ

दरम्यान, AAP च्या विजयानंतर लगेचच, भज्जी या नावाने प्रसिद्ध असलेले सिंह यांनी ट्विटरवर मान यांचे अभिनंदन केले होते. "@AamAadmiParty आणि माझा मित्र #BhagwantMann आमचे नवीन मुख्यमंत्री बनल्याबद्दल अभिनंदन.. भगतसिंग यांच्या खटकरकलन गावात ते नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हे ऐकून खूप आनंद झाला... हा अभिमानाचा क्षण आहे, असे त्यांनी लिहिले होते.

तसेच, AAP साठी, पंजाबमध्ये पक्षाचा हा पहिला विजय आहे. जिथे त्यांनी 117 विधानसभा जागांपैकी 92 जागा जिंकल्या आहेत. या जागांवरील राज्यसभेच्या पाच जागा पुढील महिन्यात रिक्त होणार आहेत. निवडणूक आयोगाने द्वैवार्षिक निवडणुकांच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. 31 मार्च रोजी मतदान होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर 'आप' चे राज्यसभेतील संख्याबळ 3 वरुन 8 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पक्ष लवकरच या जागांसाठी नवे उमेदवार जाहीर करेल अशी शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com