Indian Super League : हैदराबाद प्रथमच अंतिम फेरीत

ISL : गोलसरासरीत एटीके मोहन बागानले आव्हान संपले
Hyderabad
Hyderabad dainik gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : परतीच्या उपांत्य लढतीत एटीके मोहन बागानने विजय मिळविला, पण ते हैदराबाद एफसी रोखू शकले नाहीत. गोल सरासरीतील 3-2 या आघाडीच्या बळावर हैदराबादच्या संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. येत्या रविवारी (ता. 20) आठव्या मोसमातील विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर दोन वेळच्या माजी उपविजेत्या केरळा ब्लास्टर्स संघाचे आव्हान असेल. (Hyderabad enters first time in Indian Super League final)

बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर (Athletic Stadium in Bambolim) बुधवारी फिजी देशाच्या रॉय कृष्णा याने 79व्या मिनिटास नोंदविलेल्या गोलमुळे एटीके मोहन बागानने 1-0 फरकाने विजय नोंदविला. मात्र पहिल्या टप्प्यात याच मैदानावर हैदराबादने (Hyderabad) 3-1 असा विजय मिळविला होता, त्यामुळे उपांत्य फेरीतील दोन लढतीनंतर त्यांची गोलसरासरी +1 अशी सरस ठरली. गतउपविजेत्या एटीके मोहन बागानला सलग दुसऱ्या मोसमात अंतिम फेरी गाठता आली नाही.

एटीके मोहन बागानला बुधवारी -2 गोलसरासरी भरून काढणारा विजय हवा होता. त्यांनी जोरदार प्रयत्न केले, पण हैदराबादने बचावावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. त्यांचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने किमान दोन वेळा एटीके मोहन बागानला गोल (Goal) नोंदविण्यापासून रोखले. त्याने 31व्या मिनिटास जागरूक राहत लिस्टन कुलासोचा फटका पायाने रोखला.

Hyderabad
'ज्या' शाळेत पेपर फुटेल 'त्या' शाळेची मान्यताच रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

नंतर 50व्या मिनिटास कट्टीमनी याने रॉय कृष्णाला यशस्वी होऊ दिले नाही. भरपाई वेळेत एटीके मोहन बागान पाठोपाठ दोन कॉर्नर फटके मिळाले, परंतु गोलरक्षक कट्टीमनी आणि बचावफळीने ढिलाई दाखविली नाही.

सामन्यातील अकरा मिनिटे बाकी असताना कृष्णाने सलग दुसरा, तर मोसमातील सातवा गोल (Goal) केला, त्यामुळे सामन्यात एटीके मोहन बागानला (ATK Mohan Bagan) आघाडी घेतला आही. फिजी देशाच्या आंतरराष्ट्रीय (International) आघाडीपटूने ताकदवान फटक्यावर अचूक लक्ष्य साधले. मैदानाच्या डाव्या बाजूने लिस्टन कुलासोने सुरवातीची चाल रचली व चेंडू मोकळा असलेल्या कृष्णाच्या स्वाधीन केला. अनुभवी आघाडीपटूने संधीचे सोने करत गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com