

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा त्याच्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. नताशा स्टॅनकोविकसोबतचा घटस्फोट आणि त्यानंतर जोडली गेलेली नवनवीन नावे यामुळे हार्दिक सतत हेडलाईन्समध्ये असतो. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने हार्दिकच्या याच 'रोमँटिक' प्रतिमेवर एक अशी टिप्पणी केली आहे, ज्याने नेटकऱ्यांमध्ये हशा पिकवला आहे.
आशिष नेहरा अलीकडेच आपली पत्नी रुश्मा, माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांच्यासह 'हु इज द बॉस' (Who’s The Boss?) या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात एका मजेशीर खेळात खेळाडूंना विविध चित्रपटांच्या नावांनुसार क्रिकेटपटूंची नावे सुचवायची होती. जेव्हा 'खिलाडी नंबर वन' या चित्रपटाचे नाव आले, तेव्हा आशिषने हरभजनची फिरकी घेतली. मात्र, खरा धमाका झाला तो 'देवदास' चित्रपटाच्या वेळी.
जेव्हा 'देवदास' या चित्रपटाचा विषय निघाला, तेव्हा हरभजन सिंगने विचार न करता तात्काळ 'हार्दिक पांड्या'चे नाव घेतले. यावर आशिष नेहराने आश्चर्याने विचारले, "का?". त्यावर भज्जीने काही उत्तर देण्यापूर्वीच नेहराने स्वतःच एक चपखल उत्तर दिले. आशिष म्हणाला, "मी तर असं ऐकलंय की तो रोज 'पारो' बदलतो!" (I have heard woh toh roz Paro change karta hai). नेहराचे हे वाक्य ऐकताच हरभजन आणि गीता बसरा यांना हसू अनावर झाले. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून हार्दिकच्या डेटिंग लाईफवर नेहराने मारलेला हा 'सिक्सर' अनेकांना आवडला आहे.
हार्दिक पांड्याने मे २०२० मध्ये मॉडेल नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. मात्र, जुलै २०२४ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली. घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाशी जोडले गेले. त्यानंतर तो माहीका शर्माला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आणि अखेर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने स्वतः सोशल मीडियावर या नात्यावर शिक्कामोर्तब केले. आशिष नेहराची ही मिश्किल टिप्पणी हार्दिकच्या याच प्रवासाकडे इशारा करणारी होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.