अर्शदीप सिंगने इन्स्टाग्रामवर चालवले 'क्लीनअप ड्राइव्ह'; विराट कोहलीसोबतची 'ती' व्हायरल रीलही केली डिलीट, नेमकं झालं काय?

Arshdeep Singh Virat Kohli Viral Reel Removed: आयपीएलमधील निराशाजनक हंगामानंतर अर्शदीपने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक-दोन नव्हे, तर तब्बल 200 हून अधिक पोस्ट डिलीट करत डिजिटल जगतात मोठी 'क्लीनअप मोहीम' राबवली.
Arshdeep Singh Virat Kohli Viral Reel Removed
Arshdeep Singh & Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Arshdeep Singh Deletes Instagram Posts: टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या आयपीएल 2026 मधील त्याच्या अत्यंत खराब आणि निराशाजनक कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आला. मैदानावर सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याने चाहत्यांच्या टीकेचा धनी बनलेल्या अर्शदीपने आता सोशल मीडियाच्या जगात एक मोठे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलमधील (IPL) निराशाजनक हंगामानंतर अर्शदीपने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक-दोन नव्हे, तर तब्बल 200 हून अधिक पोस्ट डिलीट करत डिजिटल जगतात मोठी 'क्लीनअप मोहीम' राबवली. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीसोबतच्या त्याच्या अत्यंत लोकप्रिय आणि व्हायरल झालेल्या रीलचाही समावेश असल्याने क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले.

Arshdeep Singh Virat Kohli Viral Reel Removed
IPL 2026: "त्या तिघांना चपलेने मारा...", प्लेऑफमधून बाहेर पडताच युवराज सिंगचा चढला पारा; सोशल मीडियावर दिली जाहीर धमकी

अर्शदीप सिंगच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील या अचानक झालेल्या बदलाने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या अकाऊंटवरुन अनेक जुने फोटो, रील व्हिडिओ आणि विविध ब्रँड्सच्या जाहिरातींचे व्हिडिओ अचानक गायब झाल्याचे नेटीझन्सच्या निदर्शनास आले. डिलीट करण्यात आलेल्या या कंटेन्टमध्ये विराट कोहलीसोबतचा तो हलकाफुलका आणि मजेशीर व्हिडिओ देखील आहे, जो काही दिवसांपूर्वी पडद्यामागील गमतीजमती आणि दोघांमधील अद्भुत बाँडिंगमुळे सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता.

Arshdeep Singh Virat Kohli Viral Reel Removed
IPL 2026: मॅचनंतरही हायव्होल्टेज ड्रामा! विराट कोहली भडकला; भरमैदानात ट्रॅव्हिस हेडला…, VIDEO होतोय व्हायरल

आयपीएल दरम्यान चाहत्यांना प्रचंड आवडलेला हा व्हिडिओ अचानक काढून टाकल्यामुळे, अर्शदीप मैदानाबाहेरील आपले लक्ष पूर्णपणे हटवून स्वतःला एका नवीन मानसिकतेत तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Arshdeep Singh Virat Kohli Viral Reel Removed
IPL 2026 Points Table: "दिल्लीचा धमाका, राजस्थानची जयपूरमध्ये नाचक्की!" गुणतालिकेत मोठी उलथापालथ; कॅपिटल्सची प्लेऑफकडे झेप

पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजासाठी यंदाचा आयपीएल हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा राहिला. अनेक सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीत धार दिसली नाही आणि त्याला धावा रोखण्यातही अपयश आले, ज्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. या सोशल मीडिया पुरवणीबाबत अर्शदीप सिंग किंवा त्याच्या व्यवस्थापन संघाकडून (Management Team) अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य किंवा स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही. मात्र, आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी आणि देशाच्या इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपूर्वी स्वतःचे लक्ष विचलित होऊ नये, म्हणून त्याने हा 'रीसेट' मोड ऑन केल्याचे बोलले जात आहे.

Arshdeep Singh Virat Kohli Viral Reel Removed
IPL 2026 Points Table: आयपीएलचा क्लायमॅक्स सुरु! दिल्लीला पराभवाची धूळ चारत चेन्नई पुन्हा फॉर्ममध्ये, गुणतालिकेत उडवली खळबळ; मुंबई-केकेआरचं पॅकअप?

खरं तर, अर्शदीप सिंगची ओळख केवळ मैदानावर अचूक यॉर्कर टाकणारा गोलंदाज म्हणून नाही, तर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आणि मनोरंजक खेळाडू म्हणून आहे. सामन्याव्यतिरिक्त संघातील सहकाऱ्यांसोबतचे पडद्यामागील मजेशीर प्रसंग, खेळाडूंची थट्टा-मस्करी आणि विविध ट्रेंड्सवर रील बनवणे यासाठी तो ओळखला जातो. यामुळेच क्रिकेटच्या मैदानाबाहेरही त्याचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत, अचानक सोशल मीडियावरुन इतका मोठा डेटा डिलीट करण्याचा त्याचा निर्णय चाहत्यांसाठी धक्कादायक असला, तरी तो त्याच्या खेळावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतलेला एक गंभीर व सकारात्मक निर्णय मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com