Late Night Sleep: रात्रभर मोबाईल पाहण्याच्या नादात झोपायचं विसरताय? मग गंभीर मानसिक आजारांना निमंत्रण देताय

Late Night Sleep Side Effects: रात्री उशिरा झोपतात किंवा उशिरापर्यंत जागे राहतात अशा लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्य विकारांचा धोका वाढतो.
Using Mobile While Sleeping
Late Night Sleep Side Effects
Published on
Updated on

Late Night Sleep Side Effects

रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतोच शिवाय त्यांच्या संपूर्ण आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, अशी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या एका नवीन अभ्यासातून समोर आली आहे. या संशोधनात सुमारे ७५ हजार लोकांच्या झोपेचे नमुने तापसण्यात आले. झोपेच्या योग्य वेळेचे पालन न केल्यास मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे या अभ्यासतून निदर्शनास आले आहे.

या संशोधनात सहभाग घेतलेल्यांना 3 श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. लवकर झोपतात त्यांची एक श्रेणी, वेळेवर झोपणाऱ्यांना दुसऱ्या श्रेणीत आणि जे उशिरा झोपतात त्यांना तिसऱ्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. यानंतर या सर्व श्रेणीतील लोकांचे मानसिक आरोग्यही तापसण्यात आले.

Using Mobile While Sleeping
OCI Card: माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांना अनिवासी भारतीय ओळखपत्र जारी

रात्री उशिरा झोपतात किंवा उशिरापर्यंत जागे राहतात अशा लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्य विकारांचा धोका वाढतो, असे या संशोधनात असे आढळून आले. तसेच, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर लवकर झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त नकारात्मक परिणाम होतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

वैद्यकीय तज्ञ काय सांगतात?

तुम्हाला जर रात्री लवकर झोपण्याची सवय लावायची असेल, तर त्यासाठी रात्री हलका आहार घ्या आणि अंधाऱ्या खोलीत झोपा. काही तज्ञांचे मते आहे की जर तुम्हाला रात्री लवकर झोपायचे असेल तर तुम्ही डोक्याची किंवा पायाची मालिश देखील करू शकता, यामुळे तुमच्या शरीरालाही आराम मिळतो.

Using Mobile While Sleeping
Goa Education: शिक्षण संचानालयाचा मोठा निर्णय!! शिक्षकांची धावपळ थांबली; पेपर तपासणी केंद्रांमध्ये वाढ

झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून प्यायल्याने लवकर झोप येण्यास मदत होते, असे काही तज्ञांचे मत आहे. याशिवाय झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा स्क्रीनचा जास्त वापर न केल्यास झोप येण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com