Goa Education: शिक्षण संचानालयाचा मोठा निर्णय!! शिक्षकांची धावपळ थांबली; पेपर तपासणी केंद्रांमध्ये वाढ

Paper Checking Centers Goa: शिक्षकांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून शिक्षण संचानालयाकडून हा निर्णय घेतला गेल्याची माहिती गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली
 Goa schools exam news
Goa schools exam newsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिक्षण संचानालयाकडून यंदा पेपर तपासणीसाठी केंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्यावर्षी पेपर तपासणीची संख्या तीनवरून आठ करण्यात आलीये. पेपर तपासणीची मार्ग सुरळीत व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. शिक्षकांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून शिक्षण संचानालयाकडून हा निर्णय घेतला गेल्याची माहिती गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलीये.

काही दिवसांपूर्वी पेपर तपासणीला शिक्षक अपुरे पडत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, मात्र या तक्रारींमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हणत, पेपर तपासणी केंद्र कमी असल्याने शिक्षकांची धावपळ होते आणि म्हणून शिक्षकांची उपस्थिती अपुरी पडते अशी माहिती भगीरथ शेट्ये यांनी दिली.

 Goa schools exam news
Goa Education: एप्रिलमध्ये शाळा नकोच! पालकांचा कडाडून विरोध, निवेदनावर 10 हजारहून अधिक स्वाक्षऱ्या; काय आहेत कारणे? वाचा

शिक्षकांची धावपळ लक्षात घेऊन यंदाच्या वर्षीपासून उत्तर गोव्यात पेडणे, म्हापसा, कुजिरा आणि डिचोली आणि दक्षिण गोव्यात केपे, कुंकळ्ळी, फोंडा आणि मडगाव येथे केंद्र सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिलीये.

डिचोली केंद्रात काम करत असलेले शिक्षक पुरेसे आहेत. तरीही येत्या दोन दिवसांत आणखीन सहा शिक्षक देण्यात येतील अशी माहिती शेट्ये यांनी दिली. हिंदीच्या पेपर तपासणीसाठी ५०० शिक्षकांची नियुती करण्यात आलीये. शिक्षकांसाठी हे जवळचे केंद्र असल्याने सकाळपासूनच पेपर तपासणीला सुरुवात झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com