OCI Card: माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांना अनिवासी भारतीय ओळखपत्र जारी

Aires Rodrigues: सहा महिन्यांची अट पूर्ण झाल्यानंतर, अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा ओसीआयसाठी अर्ज केला.
Aires Rodrigues gets OCI Card
Aires RodriguesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारत सरकारने अखेर अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांना अनिवासी भारतीय ओळखपत्र (ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड) जारी केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २८ जानेवारी रोजी भारताच्या गृहमंत्रालयाला आदेश दिला होता की, अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांच्या ओसीआय कार्डसाठीच्या नव्या अर्जाचा चार आठवड्यांत निर्णय घ्यावा.

न्यायालयाने आपल्या आदेशात अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी ३० जानेवारीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि लिस्बन येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी ५ फेब्रुवारीला त्यांना बोलवून सर्व औपचारिकता पूर्ण करावी, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी दूतावासाच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून सर्व औपचारिकता पूर्ण केली.

Aires Rodrigues gets OCI Card
Goa Police: कर्कश आवाजाच्या दुचाकींवर पोलिसांचा 'अंकुश', फोंड्यात तिघांवर गुन्हा दाखल

१५ मे २०२३ रोजी अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी लिस्बन येथे पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात परत येताच कायद्यानुसार भारतीय पासपोर्ट जमा करण्याची प्रक्रिया गोवा पासपोर्ट कार्यालयात पूर्ण केली. भारतीय पासपोर्ट जमा करून त्याचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांनी ओसीआय कार्डसाठी अर्ज केला.

मात्र, मुंबईतील विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने त्यांना नवीन नियमांनुसार अर्ज करण्यापूर्वी गोव्यात किमान सहा महिने वास्तव्यास राहणे बंधनकारक असल्याचे सांगितले. सहा महिन्यांची अट पूर्ण झाल्यानंतर, अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा ओसीआयसाठी अर्ज केला.

Aires Rodrigues gets OCI Card
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर सुटकेसमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह; टॅटूमुळे मिळणार क्ल्यू?

न्यायालयाचा गृहमंत्रालयाला आदेश

२५ जुलै २०२४ रोजी उच्च न्यायालयाने विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाचा निर्णय रद्द करून गृहमंत्रालयाला ३० दिवसांच्या आत ओसीआय अर्जाचा पुनर्विचार करून अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. ही बाब नंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचली, जिथे गृहमंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. मात्र, हा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात गेला आणि अखेरीस अ‍ॅड. रॉड्रिग्स यांना ओसीआय कार्ड जारी करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com