Workout Tips: रिकाम्या पोटी व्यायाम करणे शरीरासाठी हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ञांच्या मत

अनेक लोक फिट राहण्यासाठी वर्कआउट, व्यायाम, जिम, योगा करतात.
Workout
WorkoutDainik Gomantak
Published on
Updated on

Workout Tips: धावपळीच्या जीवनात स्वतःच्या फिटनेसची काळजी घेणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आजकाल बहुतेक लोक वर्कआउट, व्यायाम, जिम, योगा याद्वारे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

अशावेळी एक प्रश्न वारंवार मनात फिरतो की रिकाम्या पोटी कसरत करणं योग्य आहे का? बहुतेक लोक असे आहेत जे सकाळी नाश्ता करण्यापूर्वी व्यायाम करतात.

अनेक आरोग्य तज्ञ मानतात की जर एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे असेल तर त्याने रिकाम्या पोटी व्यायाम केला पाहिजे. दुसरीकडे, खाल्ल्यानंतर व्यायाम केल्याने तुम्हाला अधिक एनर्जा मिळते. तुम्ही दीर्घकाळ व्यायाम करू शकता. रिकाम्या पोटी व्यायामाचे तोटे जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामापूर्वी आणि नंतर काय खाल्याने शरीराला फायदा होतो हे जाणून घेऊया.  

  • रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते का?

रिकाम्या पोटी व्यायामाला 'फास्टेड कार्डिओ' म्हणतात. अशावेळी हा सिद्धांत कार्य करतो की आपण जे अन्न खाल्ले ते आपल्या शरीराद्वारे पचले जाते आणि चरबी आणि कर्बोदकांमधे रूपांतरित होते. जे शरीराला पोषण देते. त्यामुळे शरीरात चरबी कमी जाणवते. 

2016 च्या संशोधनानुसार उपवासाचा आपल्या शरीरावर लक्षणीय परिणाम होतो. या संशोधनात असे समोर आले आहे की, 12 पुरुषांवर एक संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये ज्यांनी व्यायाम करण्यापूर्वी नाश्ता केला नाही. ते जास्त चरबी कमी करायचे आणि त्यांचे उष्मांक 24 तासांत कमी होते.

त्याच वेळी, काही अभ्यास हे संशोधन नाकारतात. 2014 मध्ये 20 महिलांवर संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की ज्यांनी वर्कआउटच्या आधी जेवण केले किंवा उपवास केला त्यांचे 4 आठवड्यांत बरेच वजन नियंत्रणात आले.

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने तुमच्या शरीराला प्रथिने इंधन म्हणून वापरता येतात. यामुळे तुमच्या शरीरात प्रोटीन कमी होते. जे व्यायामानंतर स्नायू तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असते. तसेच, उर्जा म्हणून चरबी वापरणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या शरीरातील एकूण फैटची टक्केवारी कमी कराल किंवा जास्त कॅलरी जाळाल.

Workout
Best Food For BP And Sugar: सकाळी हे 6 पदार्थांचे करावे सेवन, बीपी-शुगर राहिल नियंत्रणात
  • रिकाम्या पोटी व्यायाम करणे सुरक्षित आहे का?

रिकाम्या पोटी व्यायाम (Yoga) करण्याच्या समर्थनार्थ काही संशोधन असले तरी त्याचा अर्थ ते योग्य आहे असे नाही. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी व्यायाम करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातील आवश्यक प्रथिने आणि चरबी देखील काढून टाकू शकता. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे व्यायामा दरम्यान चक्कर येणे. मळमळ होणे यासारख्या समस्या जाणावतात. 

  • वर्कआउट करण्यापूर्वी की नंतर खावे?

वर्कआउट, जिम ट्रेनिंग, बॅडमिंटन, योगा, चालणे, गोल्फिंग, रनिंग, टेनिस, क्रिकेट हे सर्व मैदानी अॅक्टीव्हीटी आहेत. ज्यामध्ये तुम्हाला खूप ऊर्जा लागते. एनर्जेसाठी तुम्हाला तुमच्या शरीराला निरोगी अन्न द्यावे लागेल. 

आपण व्यायाम करण्यापूर्वी काही खाणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला भरपूर ऊर्जा आणि शक्ती मिळेल. जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ कसरत करण्याची योजना करत असाल तर हे विशेषतः महत्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com