Health Tips: चांगल्या झोपेमुळे कमी होतो हृदयरोगाचा धोका

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची
sleep
sleep Dainik Gomantak
Published on
Updated on

चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप जास्त महत्त्वाची असते. सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी प्रत्येकाने प्रयत्न करायलाच हवेत. वयोमानानुसार वृद्ध व्यक्तींना कोणत्याही व्यत्ययाशिवाय किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशा झोपेअभावी आरोग्याच्या एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. झोपेसंबंधीचे आजार दूर ठेवण्यासाठी तज्ज्ञ वारंवार झोपेचे महत्त्व पटवून सांगत असतात. (Good sleep reduces the risk of Heart disease)

रात्री चांगली झोप न मिळालेल्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका अन्य व्यक्तींच्या तुलनेने सर्वाधिक असतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात समोर आले आहे.

संशोधनातील निष्कर्ष -

रात्री चांगली झोप घेणे ही जीवनातील एक आवश्यक तत्त्व आहे. व्यवस्थित झोप हि वजन, रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी, वजन, थकवा याबरोबर हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते,असे ‘अमेरिकेतील हार्ट असोसिएशन’च्या संशोधनात आढळले आहे.

झोपेसाठीचे टाईमटेबल निश्चित करा आणि ते फॉलो करा

आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, झोपेसंबधी काही समस्या असलेल्या व्यक्तींचे झोपेच्या वेळापत्रकाचा अभाव ही सामान्य बाब आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी चांगल्या झोपेसाठी दररोज वेळेवर झोपण्याची गरज असते. यामुळे शरीराचे झोपेचे आणि उठण्याचे टाईमटेबल व्यवस्थित ठेवण्यास मदत होऊ शकते .( Set a timetable for sleep and follow it)

sleep
Side Effects of Oversleeping: आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणे आरोग्यासाठी घातक

आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या

रोजचा आहार हा झोपेच्या गुणवत्तेवर अधिक प्रभाव टाकत असतो. विशेषत: झोपण्यापूर्वी कोणता आहार घेतला ते महत्त्वाचे असते. तसेच निकोटीन, कॅफीन आणि अल्कोहल हे झोपवर परिणाम करतात. त्याचबरोबरच अशा पदार्थाच्या व्यसनामुळे शरीराचे अन्य प्रकारेही नुकसान होते आणि त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो.

नियमित योगासने आणि व्यायाम करा

रोजच्या रोज योगासने, व्यायाम हे रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी मदत करतात. रात्रीच्या जेवणानंतर थोडं चालण्याची सवय करा. चालल्यामुळे पचन शक्ती सुधारण्यासाठी मदत होते. व्यायामामुळे आणि योगासनांमुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com