Mental Health Crisis: चिंता आणि नैराश्यात बुडाली ‘डिजिटल पिढी’; तरुणपणातच Gen Z सर्वात दुःखी, जागतिक अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Generation Z: नवीन अभ्यासानुसार, सध्याचे तरुण (Gen Z) लोक त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच प्रचंड दुःखी, निराश आणि चिंतेत असल्याचे समोर आले आहे.
Midlife Crisis vs Gen Z:
Generation ZDainik Gomantak
Published on
Updated on

Midlife Crisis vs Gen Z: 'चाळीशीतलं संकट' किंवा ‘मिडलाईफ क्रायसिस’ (Midlife Crisis) ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये आनंद आणि समाधान हे वयानुसार वाढणारे होते, पण चाळिशीच्या आसपास मात्र त्यात घट होत असे. मात्र, एका नवीन जागतिक अभ्यासाने ही जुनी धारणा पूर्णपणे बदलून टाकली आहे. या नवीन अभ्यासानुसार, सध्याचे तरुण (Gen Z) लोक त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच प्रचंड दुःखी, निराश आणि चिंतेत असल्याचे समोर आले आहे.

अमेरिका (America) आणि ब्रिटनसह जगभरातील 44 देशांमध्ये केलेल्या या संशोधनाने धक्कादायक निष्कर्ष दिले आहेत. या अभ्यासानुसार, आजचे 12 ते 28 वयोगटातील तरुण (Generation Z) अभूतपूर्व पातळीवरील निराशा आणि चिंतेचा अनुभव घेत आहेत. याउलट, पूर्वीच्या पिढ्या त्यांच्या तरुणपणात आनंदी आणि समाधानी होत्या. त्यांच्या आयुष्यातील दुःखाचा टप्पा वयाच्या 50 व्या वर्षी सुरु होत असे, त्यालाच ‘मिडलाईफ अनहॅपीनेस हंप’ असे म्हटले जायचे.

Midlife Crisis vs Gen Z:
Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

‘हंप’ नाही, ‘स्की स्लोप’

दरम्यान, हा अभ्यास ‘Gen Z’ च्या अनुभवाला ‘स्की स्लोप’ (Ski Slope) असे संबोधतो, जिथे दुःखाची पातळी तारुण्यात शिखरावर पोहोचते आणि वयानुसार हळूहळू कमी होते. या बदलाचे मुख्य कारण म्हणजे तरुणांमध्ये वाढत असलेल्या मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्या. अभ्यासाचे सह-लेखक अलेक्स ब्रायसन यांच्या मते, ही समस्या केवळ एका देशापुरती मर्यादित नसून, एक जागतिक संकट बनली आहे. अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC)’ च्या आकडेवारीनुसार, ही वाढ स्पष्टपणे दिसून येते. 1993 ते 2023 या काळात तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या 2.5% वरुन 6.6% पर्यंत वाढल्या, तर तरुण महिलांमध्ये हा आकडा 3.2% वरुन 9.3% पर्यंत वाढला आहे.

तसेच, या वाढत्या नैराश्यामागे ‘Gen Z’ समोर असलेल्या काही विशिष्ट समस्या कारणीभूत आहेत. 2013 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, त्यावेळच्या मिलेनियल पिढीतील (Millennials) 52% लोकांनी त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असल्याचे सांगितले होते. याच्या तुलनेत, 2019 मध्ये झालेल्या एका Gallup सर्वेक्षणात, ‘Gen Z’ मधील केवळ 15% लोकांनीच त्यांच्या मानसिक आरोग्याला ‘उत्कृष्ट’ असे रेट केले. ही आकडेवारी एका दशकातील मानसिक आरोग्यातील मोठी घसरण दर्शवते.

Midlife Crisis vs Gen Z:
Health Tips: जेवणानंतर लगेच पाणी की थोड्या वेळाने? योग्य सवय कोणती हे वाचा

Gen Z वरील दबाव

हा अभ्यास ‘Gen Z’ समोर असलेल्या काही खास दबावांवरही प्रकाश टाकतो, जे पूर्वीच्या पिढ्यांनी अनुभवले नाहीत:

  1. सोशल मीडियाचा काळ: ‘Gen Z’ ही पहिली अशी पिढी आहे, जी जन्मापासूनच इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाढली. सोशल मीडियावर नेहमीच एक ‘उत्तम’ जीवन दाखवण्याचा दबाव असतो, ज्यामुळे तुलना, सायबरबुलिंग आणि अपुऱ्या असण्याची भावना वाढीस लागते.

  2. महामारीतील नुकसान: कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये या पिढीने त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे, जडणघडणीचे वर्ष गमावले. सामाजिक संवाद, शाळा-कॉलेजचे जीवन आणि मित्र-मैत्रिणींसोबतच्या प्रत्यक्ष भेटीगाठी थांबल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला.

  3. कर्जाचा बोजा: आजच्या तरुणांवर वैयक्तिक कर्जाचा मोठा बोजा आहे, ज्यामुळे आर्थिक असुरक्षितता आणि भविष्याची चिंता वाढली आहे.

स्मार्टफोनचा मोठा वाटा

तसेच, या अभ्यासात स्मार्टफोनच्या वाढत्या वापराला या समस्यांसाठी एक प्रमुख घटक मानले आहे. ब्रायसन यांच्या मते, “स्क्रीनचा वापर आणि मानसिक आरोग्याच्या समस्या यांच्यात केवळ संबंधच नाही, तर त्यांचा थेट परिणामही दिसून येतो.” या अभ्यासाचे आणखी एक सह-लेखक डेव्हिड जी. ब्लँचफ्लॉवर यांनी या प्रवृत्तीला “जागतिक संकट” असे म्हटले. त्यांनी या समस्यांवर उपाय म्हणून शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालणे आणि प्रत्यक्ष भेटीगाठी वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे यांसारख्या उपायांचे समर्थन केले.

Midlife Crisis vs Gen Z:
Corona Health Impact: 'कोरोना' झालेल्यांना जाणवणार नवीन धोका! आंतरराष्ट्रीय संशोधनातून मोठा खुलासा; महिलांसाठी गंभीर

Gen Z म्हणजे कोण?

‘Generation Z’ म्हणजेच ‘Gen Z’ मध्ये साधारणतः 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश होतो. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ (Digital Native) असे म्हटले जाते, कारण त्यांचा जन्म इंटरनेट आणि डिजिटल उपकरणांच्या युगात झाला. ते तंत्रज्ञानात खूप कुशल असले तरी, यामुळे त्यांच्या सवयी, सामाजिक जीवन आणि मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. लहान मुलांपेक्षा त्यांच्या स्मार्टफोनचा वापर अधिक असल्याने त्यांच्यावर डिजिटल जगातील दबावही जास्त आहे.

या जागतिक अभ्यासाने एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. ही पिढी समाजासाठी भविष्यातील आधारस्तंभ असून त्यांना आनंद व मानसिक स्थैर्य देण्यासाठी ठोस पावले उचलणे ही आता काळाची गरज बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com