Corona Health Impact: 'कोरोना' झालेल्यांना जाणवणार नवीन धोका! आंतरराष्ट्रीय संशोधनातून मोठा खुलासा; महिलांसाठी गंभीर

Corona Blood Vessels Aging: कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांचे वय वाढून त्या पाच वर्षांनी वृद्ध होऊ शकतात, असा निष्कर्ष संशोधनात काढला आहे. महिलांना अधिक धोका असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
Corona In Goa
Corona In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: कोरोनाच्या जागतिक साथीला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या विषाणूच्या दुष्परिणामांवर अजूनही संशोधन सुरू आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांचे वय वाढून त्या पाच वर्षांनी वृद्ध होऊ शकतात, असा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संशोधनात काढला आहे. विशेषत: महिलांना अधिक धोका असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.

संशोधनाचे निष्कर्ष ‘युरोपियन हार्ट जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांनी ऑस्ट्रेलिया, ब्राझीलसह युरोपातील १६ देशांमधील २,४०० कोरोना रुग्णांचा अभ्यास केला. यात निम्म्या महिला होत्या.

कोरोनातून बरे झाल्यानंतरही दीर्घ कालावधीसाठी अनेकांना श्वास घेण्यास त्रास तसेच प्रचंड थकव्याचा सामना करावा लागला.संशोधक रोसा ब्रूनो म्हणाल्या, की कोरोना विषाणू शरीरातील ‘एंजिओटेंसिन-कन्व्हर्टिंग एन्झाईम २’ (एसीई२) रिसेप्टर्सवर परिणाम करतो. हे रिसेप्टर्स रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर असतात.

कसे केले संशोधन?

कोरोना झालेल्या सहभागी व्यक्तींच्या रक्तवाहिन्यांचे वय एका उपकरणाद्वारे मोजण्यात आले. या उपकरणाच्या माध्यमातून मान व पायातील रक्तवाहिनींमधील रक्तदाबाचा वेग तपासण्यात आला. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘कॅरोटिड-फेमोरल पल्स वेव्ह वेलॉसिटी’ म्हटले जाते, ज्यातून रक्तवाहिन्यांची लवचिकता व वय समजू शकते. या चाचणीत प्रमाण अधिक आल्यास रक्तवाहिन्या अधिक कडक व वृद्ध झाल्याचे सूचित होते.

Corona In Goa
Corona Vaccine: कोविड लस घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो का? ICMR, NCDC चा अहवालातून केले स्पष्ट

सर्व व्यक्तींची ही चाचणी कोरोना संसर्गानंतर सहा महिन्यांनी व त्यानंतर पुन्हा १२ महिन्यांनी करण्यात आली. नाडी लहरीच्या वेगात प्रतिसेकंद ०.५ मीटरने वाढ होणे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाची असून ती पाच वर्षांच्या वृद्धत्वासमान आहे. साठवर्षीय महिलेत त्यामुळे हदयविकाराचा धोका तीन टक्क्यांनी वाढतो, असेही संशोधकांनी सांगितले. कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या महिलांत नाडी लहरीचा वेग प्रतिसेकंद ०.५५ मीटरने वाढला होता तर रुग्णालयात दाखल केलेल्या व अतिदक्षता विभागात ठेवलेल्या महिलांत तो अनुक्रमे ०.६० मीटर प्रतिसेकंद आणि एक मीटर प्रतिसेकंद होता. महिलांत तो पुरुषांइतका महत्त्वाचा नसल्याचेही संशोधकांना आढळले.

Corona In Goa
Corona In Goa: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, वास्‍कोत सापडला नवीन कोविड रुग्‍ण, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर

कोरोनोचा संसर्ग झालेल्या अनेकजणांना श्वास घेण्यात त्रास तसेच थकव्यासारखी लक्षणे अनेक महिने ते वर्षांपर्यंत जाणवत होती. मात्र, कोरोना विषाणूमुळे आपल्या शरीरात नेमके काय बदल होऊन अशी लक्षणे जाणवतात, याचा आम्ही अद्याप अभ्यास करत आहोत. वाढत्या वयानुसार रक्तवाहिन्या कडक होत असल्या तरी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने होऊन रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकार व पक्षाघातासारखे आजार होण्याचा धोकाही वाढतो. - रोसा मारिया ब्रूनो, संशोधक, फ्रान्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com