Sameer Amunekar
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल कमी होतो, त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि गॅसेस, अॅसिडिटी वाढू शकते.
पाणी आम्ल आणि पाचक रस पातळ करते, त्यामुळे पचन एन्झाइम कमी कार्यक्षम होतात.
जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास पोट जड वाटते, फुगल्यासारखे वाटते.
अन्नाचे तुकडे नीट तुटून पचायला जास्त वेळ लागतो.
पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने फर्मेंटेशन (गॅस तयार होणे) वाढते.
अन्नातील पोषक तत्त्वे योग्य रीतीने शोषली जात नाहीत.
जेवणानंतर किमान ३०-४५ मिनिटांनी पाणी पिणे चांगले मानले जाते. जेवणाच्या आधी ३० मिनिटे पाणी घेतल्यास पचनाला मदत होते.