Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Breast Cancer Effects On Women Mental Health: स्तनाच्या कर्करोगाचा केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. कर्करोगाचे निदान होताच, महिलेचा मानसिक ताण वाढतो.
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय
Breast CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Breast Cancer Effects On Women Mental Health: आजच्या काळात स्तनाचा कर्करोग ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. पूर्वी हा आजार बहुतेक 40 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होता, परंतु आता तरुण महिलांमध्येही त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हा केवळ शारीरिक आजार नाही तर तो एखाद्या व्यक्तीवर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या देखील परिणाम करतो. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर तो प्राणघातक ठरु शकतो. अशा परिस्थितीत या आजाराबद्दल जागरुक असणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग हा कर्करोग कसा होतो ते जाणून घेऊया...

स्तनाचा कर्करोग

दरम्यान, स्तनाच्या पेशी वेगाने वाढू लागतात आणि ट्यूमर गाठीचे रुप धारण करतो तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की अनुवांशिक कारणे, हार्मोनल असंतुलन, चुकीच्या खाण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली (Lifestyle), मद्यपान, लठ्ठपणा, रेडिएशन आणि केमिकल एक्सपोजरमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो.

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाबाबत गूडन्यूज, सिंगल डोस उपचारात शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश; जाणून घ्या

स्तनाचा कर्करोग आणि मानसिक आरोग्य

फोर्टिस हॉस्पिटलच्या सायको-ऑन्कोलॉजिस्ट आरुषी सलुजा यांनी सांगितले की, स्तनाच्या कर्करोगाचा केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. कर्करोगाचे (Cancer) निदान होताच, महिलेचा मानसिक ताण वाढतो. तिला तिच्या आयुष्याची आणि भविष्याची काळजी वाटू लागते. स्तनाच्या कर्करोगादरम्यान शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीसारखे कठीण उपचार मानसिकदृष्ट्या थकवतात.

नैराश्य आणि चिंता वाढते

उपचारादरम्यान केस गळणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, शरीरातील ऊर्जेचा अभाव आणि शस्त्रक्रियेमुळे शरीरात होणारे बदल यासारख्या समस्या मानसिक त्रास देऊ शकतात. उपचारांच्या दुष्परिणामांमुळे, अनेक रुग्णांना झोप येत नाही, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक कमजोरी वाढते. रुग्णांना निराशा, चिंता आणि भीतीची भावना येते, ज्यामुळे नैराश्य आणि चिंता वाढू शकते.

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: एक लाखापेक्षाही अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी; राज्यात ५८ महिलांना कर्करोगाची लागण

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

स्तनात गाठ तयार होणे: स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे स्तनात गाठ तयार होणे. ते वाढू शकते आणि वेदना देखील होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करु नका.

स्तनाचा आकार: एका स्तनाची असामान्य वाढ किंवा आकार कमी होणे हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

स्तनाग्रांमध्ये बदल: स्तनाच्या कर्करोगामुळे स्तनाग्राचा आकार बदलू शकतो. याशिवाय, स्तनाग्रातून रक्तासह किंवा रक्ताशिवाय स्त्राव होऊ शकतो.

त्वचेतील बदल: स्तनाची त्वचा लाल, जाड किंवा आकुंचन पावलेली दिसू शकते.

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय
Cause Of Breast Cancer: सावधान! या कारणामुळे होतो स्तनाचा कॅन्सर

बचाव कसा करायचा

महिन्यातून एकदा स्तनांची तपासणी करावी. जर काही असामान्य वाटले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे, काजू आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. मद्यपान, धूम्रपान आणि जंक फूड टाळा.

दररोज किमान 30 मिनिटे योगा, चालणे किंवा व्यायाम करा. यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाईल आणि लठ्ठपणा कमी होईल.

मानसिक ताण कमी करण्यासाठी, ध्यान, योग करा. जर ताण वाढत असेल तर समुपदेशक किंवा थेरपिस्टशी बोला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com