Breast Cancer: जर 'ही' 5 लक्षणे दिसत असतील तर चुकूनही करू नका दुर्लक्ष; तुम्हाला असू शकतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

कोणताही आजार टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे शरीरात दिसणारी लक्षणे वेळेवर ओळखणे.
Breast Cancer Symptoms
Breast Cancer SymptomsDainik Gomantak
Published on
Updated on

Breast Cancer Symptoms: प्रत्येक आजाराची काही ना काही लक्षणे असतात, ज्यावरून तो आजार शरीरात वाढू लागल्याचे समजते. तथापि, या लक्षणांकडे आपण दैनंदिन समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. इतर आजारांप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगाचीही अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते प्राणघातक ठरू शकते.

कोणताही आजार टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे शरीरात दिसणारी लक्षणे वेळेवर ओळखणे. चला जाणून घेऊया ब्रेस्ट कॅन्सरची शरीरात कोणती लक्षणे दिसतात, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करण्याची चूक करतात.

Breast Cancer Symptoms
Metabolism Booster Foods: चयापचय वाढवण्यासाठी ग्रीन ज्यूस पिणे फायदेशीर; वाचा सविस्तर

1. स्तनामध्ये गुठळ्या होणे

जर तुम्हाला स्तनामध्ये गुठळ्या जाणवू लागल्या तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण तो कर्करोग असू शकतो. काहीवेळा महिलांच्या स्तनांमध्ये तयार होणाऱ्या गाठी सामान्य असतात. पण गाठ असल्यास डॉक्टरांनी तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्करोग असल्यास, त्यावर वेळेवर उपचार सुरू करता येतील.

2. स्तनांच्या आकारात आणि संरचनेत बदल

जर तुम्हाला स्तनांमध्ये आकार किंवा संरचनेत काही बदल जाणवत असतील तर त्याला हलके घेऊ नका. तत्काळ डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा. कारण ते स्तनाच्या कर्करोगाचे संकेत असू शकते.

3. निप्पल डिस्चार्ज

स्तनाग्रातून पाणी येणे किंवा काही प्रकारचे द्रव बाहेर येणे हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला स्तनांमध्ये निप्पल डिस्चार्ज सारखी लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.

4. स्तनावर डाग किंवा पुरळ

जर स्तनावर पुरळ किंवा रेड स्पॉट्स दिसत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ते स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

5. काखेत गाठ

काखेत गाठ हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला काखेत गुठळ्या वाटत असतील तर तपासणीसाठी उशीर करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com