Breast Cancer: महिलांनो स्तनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको; कर्करोगाची 'ही' लक्षणं तुमच्यात तर नाहीत ना?

Sameer Amunekar

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं सौम्य असू शकतात, तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Breast Cancer | Dainik Gomantak

गाठ

स्तनात किंवा काखेत गाठ येणे हे स्तनाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. मात्र, प्रत्येक गाठ कर्करोगाचीच असेल असे नाही. काही वेळा गाठी सौम्य (नॉन-कॅन्सरस) असतात.

Breast Cancer | Dainik Gomantak

स्तनाच्या आकारात बदल

स्तनाचा आकार अचानक बदलणे, त्वचेला लालसरपणा किंवा जाडसरपणा जाणवणे हे स्तनाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात. मात्र, काही वेळा ही लक्षणे संसर्ग (मास्टायटीस) किंवा हार्मोनल बदलांमुळेही येऊ शकतात. त्यामुळे याकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे.

Breast Cancer | Dainik Gomantak

स्तनातील वेदना

स्तनातील वेदना ही अनेक महिलांना येणारी सामान्य समस्या आहे. मात्र, जर ही वेदना सातत्याने आणि मासिक पाळीशी संबंधित नसल्यास, त्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचे आहे. काहीवेळा ही स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते

Breast Cancer | Dainik Gomantak

खाज सुटणे, जळजळ होणे

स्तनाच्या त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा दिसणे हे काही वेळा सौम्य त्वचारोगांमुळे होते, तर काही वेळा हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Breast Cancer | Dainik Gomantak

ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णांमध्ये वाढ

जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस झपाट्याने वाढत आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हा आजार वाढत चालला आहे.

Breast Cancer | Dainik Gomantak
Tips For Parents | Dainik Gomantak
येथे क्लिक करा