Workout Tips: सकाळची फ्रेशनेस की संध्याकाळची ऊर्जा? जिम करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

Workout Best Time:शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी जिम करणे हा एक उत्तम मार्ग आहे.
Workout Tips
Workout TipsDainik Gomantak
Published on
Updated on

शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी जिम करणे हा एक उत्तम मार्ग आहे. मात्र, जिमला जाण्यासाठी सकाळ योग्य की संध्याकाळ, हा अनेकांसाठी गोंधळाचा विषय असतो. दोन्ही वेळांना काही ठराविक फायदे आणि तोटे आहेत. चला तर मग, योग्य वेळ कोणती याबाबत जाणून घेऊया.

सकाळी जिम करण्याचे फायदे

सकाळी वर्कआउट केल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे संपूर्ण दिवस ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. संशोधनानुसार, रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास शरीरातील चरबी जळण्यास अधिक मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर सकाळची वेळ फायदेशीर ठरू शकते.

सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लावल्यास दिनचर्या नियमित राहते आणि उशिरापर्यंत झोपण्याची सवय कमी होते. बहुतेक लोक कामानंतर थकून जातात आणि व्यायाम टाळतात. सकाळी वर्कआउट केल्याने ही अडचण येत नाही. सकाळी जिममध्ये तुलनेने कमी गर्दी असते, त्यामुळे मशीन सहज मिळतात आणि एकाग्रतेने व्यायाम करता येतो.

Workout Tips
Gym Tips: जिमला जाता, मेहनत करता पण बॉडी नाही दिसत? 'या' ट्रिक्स करून बघा

संध्याकाळी जिम करण्याचे फायदे

दिवसभराच्या हालचालींमुळे स्नायू आधीच सक्रिय असतात, त्यामुळे संध्याकाळी जिम करताना दुखापतीचा धोका तुलनेने कमी होतो. संशोधनानुसार, संध्याकाळी शरीराची ताकद आणि स्टॅमिना जास्त असते, त्यामुळे जड व्यायाम आणि वजन उचलण्यासाठी संध्याकाळची वेळ अधिक अनुकूल ठरू शकते.

दिवसभराच्या तणावानंतर संध्याकाळी व्यायाम केल्याने मन शांत होते आणि झोप चांगली लागते. सकाळच्या वेळी बऱ्याच लोकांना जेवण केल्याशिवाय जड वर्कआउट करणे कठीण जाते. संध्याकाळी शरीराला पुरेसा पोषण आणि ऊर्जा मिळालेली असते, त्यामुळे व्यायाम प्रभावी ठरतो. संध्याकाळी जिममध्ये अनेक लोक असतात. त्यामुळे मित्रांसोबत वर्कआउट करण्याची संधी मिळते, जी प्रेरणादायक ठरू शकते.

सकाळी जिम करण्याचे तोटे

  • सकाळी शरीर पूर्णपणे उष्ण नसल्यामुळे स्नायूंना जास्त ताण येऊ शकतो.

  • लवकर उठणे अनेकांसाठी कठीण असते.

  • भरपूर उर्जा नसेल तर जड व्यायाम करण्यास मर्यादा येऊ शकते.

Workout Tips
Health Tips: तुम्ही रोज खात असणाऱ्या 'या' 4 पदार्थांमुळे हाडे होतायेत ठिसूळ!

संध्याकाळी जिम करण्याचे तोटे

  • कामानंतर थकवा आल्यास वर्कआउटसाठी उत्साह राहत नाही.

  • जिममध्ये गर्दी जास्त असल्याने वेळेचा अपव्यय होऊ शकतो.

  • उशिरा वर्कआउट केल्याने काही लोकांना झोपण्यास अडचण येते.

योग्य वेळ कोणती?

वजन कमी करायचे असेल तर सकाळी वर्कआउट करणं फायदेशीर आहे. स्नायू वाढवायचे असतील तर संध्याकाळी जड वर्कआउट उत्तम ठरेल.

जिमसाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा योग्य असल्या तरीही तुमच्या उद्दिष्टांनुसार आणि जीवनशैलीनुसार सर्वोत्तम वेळ ठरते. मुख्य गोष्ट म्हणजे नियमितता आणि सातत्य राखणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com