Sameer Amunekar
प्रथिनयुक्त आहार घ्या. जसं की, अंडी, चिकन, मासे, पनीर, डाळी, सोयाबीन. भरपूर फायबरयुक्त भाज्या आणि फळे खाणं गरजेचं आहे.
आठवड्यात किमान 4-5 दिवस वर्कआउट करा. वजनउचलणे करा – बेंच प्रेस, डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, पुल-अप्स करा. कार्डिओ व्यायाम देखील महत्त्वाचा आहे.
शरीराला पुरेसा आराम द्या, किमान 7-8 तास झोप घ्या. ओव्हरट्रेनिंग टाळा, स्नायूंना वाढण्यासाठी विश्रांती देणं गरजेचं आहे.
पुरेसं पाणी प्या (8-10 ग्लास दररोज. वर्कआउट दरम्यान आणि नंतर इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय घ्या.
सराव आणि आहार यामध्ये सातत्य ठेवा. शरीर बदलण्यास वेळ लागतो, त्यामुळे संयम ठेवा.
कोणताही व्यायाम करताना योग्य पद्धतीनं करा. सुरुवातीला प्रशिक्षकाची मदत घ्या.