Manish Jadhav
चुकीची आहार पद्धती, बदललेली जीवनशैली आणि नियमितपणे व्यायाम न केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
वाढत्या जंक फूडच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. हे सर्व आपल्याला जीवनशैलीवर अवलंबून असते.
रोजच्या आहारात आपण अनेकदा असे पदार्थ खातो ज्याचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो. इतकेच नाही तर यामुळे आपली हाडे कमकुवत होतात.
बऱ्याचदा आपण हाडांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही, परंतु हाडे आपल्या शरीराला संतुलन प्रदान करतात. त्यासाठी हाडांचे निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे.
आजकाल आपण असे अनेक पदार्थ खातो ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमसह इतर अनेक गोष्टींवर परिणाम होतो, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात.
रोजच्या आहारात खाणाऱ्या या 5 पदार्थांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी आजपासूनच आपण हे पदार्थ खाणे टाळायला हवे.
जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. याचा परिणांम हाडांवर होऊन कॅल्शियम हळूहळू कमी होऊ लागते.
प्रक्रिया केलेले पदार्थ हे अधिक प्रमाणात खाल्ल्याने यूरिक ॲसिडची समस्या वाढते. ज्याचा आपल्या हाडांवर परिणाम होतो.
चहा-कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने आपल्या हाडांवर परिणाम होतो. चहामध्ये कॅफिन आढळते.
जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. हाडे कमकुवत होऊन पाठ-कंबरेचं दुखणं अधिक वाढते.