Horoscope: वैशाख प्रतिपदेला 'या' 5 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, आर्थिक अडचणी होणार दूर! करिअर, व्यवसायात मिळणार यश

Horoscope Today April 18, 2026: आज वैशाख शुद्ध प्रतिपदा असून शनिवारचा दिवस आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत प्रतिपदा तिथी राहील, त्यानंतर द्वितीया सुरू होईल.
Horoscope Today April 18, 2026
Horoscope Today April 18, 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

आज वैशाख शुद्ध प्रतिपदा असून शनिवारचा दिवस आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत प्रतिपदा तिथी राहील, त्यानंतर द्वितीया सुरू होईल. विशेष म्हणजे आज रात्री उशिरापर्यंत 'प्रीती योग' जुळून येत असून सकाळी अश्विनी नक्षत्र आणि त्यानंतर भरणी नक्षत्र असेल. ग्रह-ताऱ्यांची ही स्थिती काही विशिष्ट राशींसाठी यशाची द्वारे उघडणारी ठरणार आहे. विशेषतः कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक सन्मान आणि कौतुकाची थाप मिळणार आहे.

कुंभ आणि मीन राशीचा दबदबा आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत सन्मानजनक असेल. तुमच्या सौम्य व्यवहारामुळे घर आणि कार्यक्षेत्र अशा दोन्ही ठिकाणी तुमचे कौतुक होईल. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी आजचा काळ उत्तम असून, एखाद्या मोठ्या संस्थेशी जोडले जाण्याची संधी मिळेल. दुसरीकडे, मीन राशीच्या व्यक्तींना ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. नवीन प्रकल्पांमध्ये मित्रांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

Horoscope Today April 18, 2026
Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

मेष, कर्क आणि वृश्चिक राशीचे नशीब फळफळणार मेष राशीच्या जातकांना आज कौटुंबिक सहकार्य लाभेल आणि आरोग्य उत्तम राहील. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस 'लकी' ठरणार असून जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राजकारणात पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. लोखंडाच्या व्यापाराशी संबंधित असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा असेल.

Horoscope Today April 18, 2026
Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

सावधानता आणि उपाय मिथुन आणि मकर राशीच्या लोकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आज सर्वच राशींनी सावध राहणे हितकारक ठरेल. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी नीट विचार करावा. सिंह राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर ताबा ठेवावा, कारण एक चुकीचा शब्द नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. एकूणच, आजचा दिवस नियोजनबद्ध पद्धतीने घालवल्यास बहुतांश राशींना सकारात्मक परिणाम मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com