Guru Ketu Yuti: नोकरी आणि व्यवसायात घवघवीत यश मिळवण्याची सुवर्णसंधी, सिंह राशीतील गुरु-केतु युती ठरणार फायदेशीर; आयुष्यात घेऊन येणार सुख, समृद्धी

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर मानवी जीवनावर मोठा प्रभाव पाडत असते. आगामी 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी देवगुरु बृहस्पती कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.
Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026
Guru Ketu YutiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर मानवी जीवनावर मोठा प्रभाव पाडत असते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी देवगुरु बृहस्पती कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाच्या या महत्त्वपूर्ण राशी बदलामुळे सिंह राशीत आधीपासूनच विराजमान असलेल्या केतुसोबत गुरुची युती जुळून येणार आहे.

ज्योतिष अभ्यासकांच्या मते, गुरु आणि केतु यांच्या संयोगामुळे निर्माण होणारी ही युती काही खास राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, विशेषतः करिअर (Career), व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणणारी ठरणार आहे. या गोचरामुळे भाग्य पूर्णपणे साथ देणार असून मेष, सिंह, कन्या आणि धनु या चार राशींच्या जातकांसाठी सोन्याचे दिवस येणार आहेत.

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026
Horoscope 20 Oct 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर धनलाभाचा उत्तम योग! नोकरी-व्यवसायातून मिळणारा आर्थिक लाभ वाढवणार संपत्ती; मेहनतीचे मिळणार गोड फळ

या विशेष युतीचा सगळ्यात पहिला आणि शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पडणार असून त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. मेष राशीच्या जातकांच्या करिअर आणि व्यापारामध्ये प्रगतीच्या नवीन वाटा मोकळ्या होणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. जर कोणी नवीन व्यवसायाची किंवा नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असेल, तर त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत योग्य मानला जात आहे. या काळात परिश्रमाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026
Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

सिंह राशीमध्येच ही युती होत असल्यामुळे या राशीच्या जातकांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. या काळात अनेक सुखद प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. जे तरुण बऱ्याच काळापासून चांगल्या नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकते आणि उच्च पदाची संधी उपलब्ध होऊ शकते.

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026
Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

कन्या राशीच्या जातकांसाठी गुरु-केतुची ही युती सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून अडकलेले महत्त्वाचे काम आता सुरळीतपणे पूर्ण होईल. व्यापार करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. केलेली मेहनत रंग आणेल आणि कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी नांदेल. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026
Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

धनु राशीच्या जातकांसाठी देखील हा गोचर काळ फार लाभदायक ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीकडून नवीन नोकरीची मोठी ऑफर मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात भरघोस परतावा देणारी ठरेल. अचानक धनलाभ झाल्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल आणि मनातील सर्व चिंता दूर होऊन एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. एकूणच, ऑक्टोबर 2026 मधील गुरुचे हे गोचर अनेक राशींच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com